भारतीय सेना- सीआयएसएफ संयुक्त प्रशिक्षण (फोटो- सोशल मीडिया)
विशेष प्रशिक्षण कॅप्सूलचा ३१ जानेवारी रोजी यशस्वी समारोप
‘एकता शक्ती’ या व्हॅलिडेशन सरावाने समारोप
औंध मिलिटरी स्टेशन येथील मिलिटरी-सिव्हिल फ्युजन नोडमध्ये समारोप
पुणे: दक्षिण कमांडतर्फे औंध मिलिटरी स्टेशन येथील मिलिटरी-सिव्हिल फ्युजन नोडमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीआयएसएफ जवानांसाठी आयोजित दोन आठवड्यांच्या विशेष प्रशिक्षण कॅप्सूलचा ३१ जानेवारी रोजी यशस्वी समारोप झाला. या प्रशिक्षणाचा समारोप ‘एकता शक्ती’ या व्हॅलिडेशन सरावाने करण्यात आला.
१९ जानेवारीपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षणाचा उद्देश जटिल आणि बदलत्या सुरक्षा परिस्थितींमध्ये प्रथम प्रतिसाद देणाऱ्या सीआयएसएफ कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि सज्जता वाढवणे हा होता. प्रशिक्षणामध्ये क्विक रिएक्शन टीम ड्रिल्स, मूलभूत फील्ड व बॅटल क्राफ्ट, फायरिंग तसेच मार्शल आर्ट्स यांचा समावेश होता, ज्यामुळे सहभागी जवानांना आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि प्रभावी प्रतिसाद देण्याचे कौशल्य विकसित झाले.
या प्रशिक्षणाचा भाग म्हणून ‘एकता शक्ती’ हा व्यापक सराव आयोजित करण्यात आला. आंतरसंस्थात्मक समन्वय आणि संयुक्त प्रतिसाद यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी झालेल्या या सरावात भारतीय सेना, महाराष्ट्र पोलिसांचे अँटी-टेररिझम स्क्वॉड व फॉरेन्सिक विभाग, यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, आर्मी डॉग युनिट, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, आर्मी बॉम्ब डिस्पोजल पथक, अग्निशमन दल यांसह एकूण बारा संस्थांचा सहभाग होता.
भारताकडे वाकड्या नजरेने बघाल तर…! ‘या’ ठिकाणी पार पडले Army-CISF संयुक्त प्रशिक्षण
या सरावातून विविध यंत्रणांमधील सुरळीत समन्वय, प्रभावी कमांड व कंट्रोल तसेच बहुआयामी प्रतिसादाची उत्कृष्ट अंमलबजावणी दिसून आली. सीआयएसएफ आणि भारतीय सेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सराव पाहून सहभागी सर्व संस्थांच्या उच्च दर्जाच्या प्रशिक्षण, व्यावसायिकता आणि समन्वयाचे कौतुक केले.
‘या’ ठिकाणी पार पडले Army-CISF संयुक्त प्रशिक्षण
देशाच्या अंतर्गत सुरक्षेला अधिक बळकट करण्यासाठी भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांड अंतर्गत औंध लष्करी छावणीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण (Pune News)कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ जानेवारीपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षणाने उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
या प्रशिक्षणात सीआयएसएफ स्ट्रेंथ १०२ मधील दोन अधिकारी आणि दहा महिला जवानांचा समावेश असून, त्यांना भारतीय लष्कराच्या जवानांकडून प्रगत रणनैतिक प्रशिक्षण दिले जात आहे. विशेषतः क्विक रिॲक्शन टीम (क्यूआरटी) ड्रिल्सवर भर देण्यात आला आहे. वाढत्या अंतर्गत सुरक्षा आव्हानांवर प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी या सरावाची रचना करण्यात आली आहे.






