'जर सरदार पटेल आणखी काही वर्ष असते तर…'; संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
सरदार पटेल मोठे नेते होते. आपण त्यांना लोहपुरूष म्हणतो. सरदार पटेल पहिले नेते होते, ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली होती. सरदार पटेल आणखी १० वर्ष जगले असते तर आज सभागृहात समोर बसलेले लोक दिसलेही नसते”, असा घणाघात शिवसेनेचे(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत केला. राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरवर सुरू असलेल्या चर्चेवरून ते बोलत होते. लोकसभेत सोमवार आणि मंगळवार दोन दिवस चर्चा झाली. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं.
कुंकूच राहिलं नाही आणि ऑपरेशन मात्र ‘सिंदूर’, कोण आहेत हे लेखक; जया बच्चन राज्यसभेत भडकल्या
संजय राऊत नक्की काय म्हणाले?
कालपासून सभागृहात भाजप नेत्यांनी त्यांच्या भाषणात पंडित नेहरूंचा वारंवार उल्लेख झाल्याचे ऐकलं. त्यांना आताही पंडित नेहरू, सरदार पटेल यांची आठवण होत आहे. भाजपाच्या नेत्यांना पंडित नेहरू तर झोपूही देत नाहीत आणि जगूही देत नाहीत. नेहरू तर महान होतेच. पण सरदार पटेलही मोठे नेते होते. आपण त्यांना लोहपुरूष म्हणतो. सरदार पटेल पहिले नेते होते, ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली होती. सरदार पटेल आणखी १० वर्ष जगले असते तर आज सभागृहात समोर बसलेले लोक दिसलेही नसते, असे विधान संजय राऊत यांनी केले.
सरदार पटेल आणखी काही काळ असते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आजीवन बंदी घातली असती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी उलट पंडित नेहरूंचे आभार मानले पाहिजेत. त्यांच्यामुळेच आज तुम्ही इथे बसला आहात. सरदार पटेल जर पंतप्रधान झाले असते तर आज दिसणारे भाजपाचे नेते देशात दिसले नसते, अशीही टिप्पणी खासदार संजय राऊत यांनी केली.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २६ लोक मारले गेले. आमच्या माता-भगिनींचं कुंकू पुसलं. याची जबाबदारी कुणाची? पंडीत नेहरू? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा उपाध्यक्ष जेडी व्हेन्स याबद्दल राजीनामा देणार का? केंद्रीय गृहमंत्र्यांची ही जबाबदारी असून त्यांनीच राजीनामा द्यायला हवा. तमचं ऐकलं नाही म्हणून देशाच्या उपराष्ट्रपतींचा २४ तासांत राजीनामा घेता, पण पहलगाममध्ये २६ लोक मारले गेले तरी कुणाचाही राजीनामा घेतला गेला नाही.
‘म्हणून सभागृहात ट्रम्प यांचं नावं घेतलं नाही’; राहुल गांधींचा PM नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्लाबोल
संसदेत सध्या ऑपरेशन सिंदूर विषयावर चर्चा सुरू आहे. लोकसभेत सोमवार आणि मंगळवार अशी दोन दिवस चर्चा झाली. मंगळवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेला उत्तर दिले. त्यानंतर आज राज्यसभेतही यावर सर्वपक्षीय खासदारांनी आपापली मते व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी स्वतःला देवाचा अवतार मानतात. त्यांचे भक्तही त्यांना ईश्वराचा अवतार मानतात. मी वेळेआधी वेळेचा अंदाज घेतो, ही माझ्यावर देवाची कृपा आहे, असं मोदी म्हणतात. मग काही दहशतवादी पहलगाम येथे घुसून २६ पर्यटकांना मारणार आहे, हे मोदींना कळले नाही का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.