Priyanka Gandhi's allegations on RSS
Priyanka Gandhi Controversial Remark on RSS: केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कॅम्पमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे RSSच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. त्याचवेळी या प्रकारामुळे राजकारणही तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एका तरुण आयटी व्यावसायिकाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या सुसाईड नोटमध्ये अनेक आरएसएस सदस्यांवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “अत्यंत भयानक” अशी शब्दांत प्रतिक्रीया देत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. पण यामुळे नव्या राजकीय वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुसऱ्यांची नव्हे तर स्वतःचीच लोकं मारतोय पाकिस्तान! तीन तासांत 280 नागरिक ठार तर 1900…, पहा Video
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर आनंदू आजी असे आहे. आनंदु आजी यांनी त्यांच्या शेवटच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये गंभीर आरोप केले आहेत. आरएसएसच्या सदस्यांकडून वारंवार होणाऱ्या लैंगिक छळामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. पण आपण याचे एकमेव बळ नाही, तर आरएसएस छावण्यांमध्ये अशा प्रकारची कृत्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.” असं त्यानी म्हटलं आहे. आनंदु आजी यांच्या या खळबळजनक खुलाशामुळे संघटनेच्या कार्यपद्धती आणि छावण्यांमधील तरुणांच्या सुरक्षिततेबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्याचे दूरगामी राजकीय परिणाम होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना प्रियांका गांधी यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत आरएसएसवर निशाणा साधला आहे.”आनंदू आजी यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये अनेक आरएसएस सदस्यांवर वारंवार लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. जर हे खरे असेल तर ते अत्यंत भयानक आहे.” आज लाखो मुले आणि किशोरवयीन मुले आरएसएस शिबिरांमध्ये जातात आणि अशा आरोपांमुळे सुरक्षितता आणि नैतिक जबाबदारीबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे आरएसएस नेतृत्वाने यावर त्वरित प्रतिक्रिया द्यावी. त्यांनी सत्य बाहेर आणले पाहिजे.” मुलांवरील लैंगिक अत्याचारावर मौन सोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
Rohit Sharma होणं सोपं नाही! अय्यरने केला अपमान, पण ‘हिटमॅन’ने दिला मान; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल
डीवायएफआयचे राज्य सचिव व्ही.के. सनोज यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. ते म्हणाले, “ज्यांनी हा गुन्हा केला आहे, त्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, ही आमची मागणी आहे. आनंदूने त्यांच्या संदेशात ज्या शाखांच्या प्रमुखांची नावे दिली आहेत, त्यांना त्वरित अटक केली पाहिजे.” दरम्यान, केरळ पोलिसांनी आनंदू आजीच्या मृत्यूची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी सांगितले की ते मृत व्यक्तीच्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि फोन रेकॉर्डच्या आधारे सत्य उघड करण्यासाठी संशयितांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
The RSS must allow these allegations to be investigated fully. In his suicide message Anandu Aji alleged that he was abused again and again by multiple members of the RSS. He clearly stated that he was not the only victim and rampant sexual abuse is taking place in RSS camps.… pic.twitter.com/IS4dDaQv7O — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 12, 2025