पाकिस्तानमध्ये नरसंहार (फोटो- ट्विटर)
पाकिस्तानमध्ये अंतर्गत वाद आला उफाळून
पाकिस्तानमधील पंजाबमध्ये लष्कराचा गोळीबार
हजारो नागरिक झाले जखमी
पाकिस्तान हा भारताच्या कायमच कुरापती काढत असतो. मात्र आता दहशतवाद्यांना पोसणारा पाकिस्तान स्वतःच अडचणीत आला आहे. पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. पाकिस्तानने आपल्याच नागरिकांचा जीव घेतला आहे. पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांनी आज मोठा नरसंहार केला आहे. यामध्ये 280 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात पाकिस्तान लष्कर आणि सैन्याने नरसंहार केला. या,ध्ये 280 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 1900 पेक्षा जास्त नागरिक या गोळीबारात जखमी झाले आहेत. सोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे रेंजर्स आणि पोलिसांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मुरीदके भागात गोळीबार केला. अमेरिका आणि इस्त्रायल गाझा कराराचा निषेध करण्यासाठी तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) चे लोक आंदोलन करत होते. तसेच याचा विरोध करण्यासाठी ते राजधानी इस्लामाबादकडे निघाले होते.
Footage of Muridkee by a possible Policeman Heartbreaking scenes 💔 which can't be share on this platform 💔 (Almiya hi almiya hy ….🥺) #muridke #lahore #karachi #explorereel #explprepage #sad pic.twitter.com/NV0qIM0z3r — Pakistan Viral Series (@Pakviralseries_) October 13, 2025
समोर आलेल्या महितीनुसार, इस्लामाबादकडे जाणाऱ्या हजारो टीएलपीच्या आंदोलकांना रोखण्यासाठी पाकिस्तान रेंजर्स आणि पोलिसांनी स्मोल ग्रेनेड फेकले. त्यानंतर गोळीबार केला. पुरावे मिटवण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने टीएलपीच्या स्टेजला आग लावली. टीएलपीचे नेते देखील गोळीबारात जखमी झाले आहेत.
पाकिस्तानचं काही खरं नाही! तालिबानचा प्रहार
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानचे काळे कारनामे काही केल्या थांबताना दिसत नाहीयेत. बहुतांशवेळा पाकिस्ताना त्याच्या कारनाम्यांमुळे तोंडघशी पडला आहे. जगभरातून पाकिस्तानला विरोध होत असतानाही पाकिस्तान शांत बसत नाहीयेत. अशातच पाकिस्तान आज एका भू-राजकीय “युद्ध त्रिकोणात” अडकला आहे. यात पाकिस्तानला नव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक आघाडीवर नवीन आव्हाने उदयास येत आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर ट्रम्प यांची खुशामत करण्यास आणि त्यांच्यासोबत जेवणाची व्यवस्था करण्यास उत्सुक आहेत. आता त्यांचे त्यांच्या कथित मित्र तालिबानशीही कटू स्पर्धा झाली आहे.
Pakistan News: पाकिस्तानचं काही खरं नाही! तालिबानचा प्रहार, बलुचांचा मार तर भारताकडून दाणादाण
पाकिस्तानचे २०२५चे प्रचार युद्ध अपयशी ठरताना दिसत आहे. पाकिस्तानने इस्लामिक उम्माला आवाहन करून तालिबान आणि बलुचिस्तानवर विजय मिळवण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे, परंतु त्यांचा अजेंडा प्रत्येक वेळी अपयशी ठरला. या वर्षी, पाकिस्तानची अवस्था मात्र फारच गंभीर झाली आहे. पाकिस्तानला तीनही बाजूंनी हल्ले सहन करावे लागत आहेत. तीन बाजूंनी हल्ले सहन करावे लागत आहेत आणि त्यांच्या कृतींमुळे त्रिपक्षीय युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वेला पाकिस्तानचा भारताशी तणाव आहे आणि पश्चिम सीमेवर अफगाण तालिबानशी तीव्र संघर्ष सुरू आहे. तालिबानने डझनभर पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आहे आणि अनेक पाकिस्तानच्या चौक्या ताब्यात घेतल्या आहेत.