Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई गर्ल्स हॉस्टेल तरुणी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर, तरुणीवर बलात्कार झालाच नसल्याचं उघड, सुरक्षारक्षकानं केली आत्महत्या

मरीन ड्राईव्ह या मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत असलेल्या सरकारी वसतीगृहात 6 जून रोजी 18 वर्षांच्या तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला होता. ही तरुणी मुळची अकोल्याची रहिवासी होती. ती वांद्रा येथे कॉलेजमध्ये शिकत होती तसंच ती पार्ट टाईम नोकरीही करत होती. आता या तरुणीच्या मृतदेहाच्या पोस्ट्मार्टेममध्ये नवी माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 10, 2023 | 07:26 AM
मुंबई गर्ल्स हॉस्टेल तरुणी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर, तरुणीवर बलात्कार झालाच नसल्याचं उघड, सुरक्षारक्षकानं केली आत्महत्या
Follow Us
Follow Us:

मुंबई : मरीन ड्राईव्ह या मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीत असलेल्या सरकारी वसतीगृहात 6 जून रोजी 18 वर्षांच्या तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला होता. ही तरुणी मुळची अकोल्याची रहिवासी होती. ती वांद्रा येथे कॉलेजमध्ये शिकत होती तसंच ती पार्ट टाईम नोकरीही करत होती. सावित्रीबाई फुले वसतीगृहात सापडलेल्या या तरुणीच्या मृतदेहानं खळबळ उडाली होती. या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला होता. याच बिल्डिंगचा सुरक्षा रक्ष असलेल्या ओमप्रकाश कनोजिया हा या प्रकरणातील संशयित आरोपी मानण्यात येत होता. मात्र हत्याकांड उघडकीस आल्यानंतर काही तासातच कनोजिया याचा मृतदेह चर्नी रोड स्टेशनजवळ रुळांवर सापडला. या प्रकारानंतर त्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. कनोजिया याचं वय 33 होतं आणि त्याचं लग्न झालेलं होतं. आता या तरुणीच्या मृतदेहाच्या पोस्ट्मार्टेममध्ये नवी माहिती समोर आली आहे.

त्या तरुणीवर बलात्कार झालाच नव्हता

तिचा मृतदेह सापडल्यानंतर तो पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला होता. आता त्याचा अहवाल समोर आला आहे. त्यात अनेक गोष्टींचा उलगडा झाल्य़ाचं सांगण्यात येतंय. या तरुणीवर बलात्कार झाल्याचा एकही पुरावा मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आणखी काही चाचण्या घेण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येतंय.

तरुणी घरी जाण्याच्या तयारीत होती

यापूर्वीही कनोजिया यानं या तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. या तरुणीनं आपल्या मैत्रिणीला ही घटना सांगितली होती. ही तरुणी 2 दिवसांनी तिच्या घरी जाणार होती, त्यासाठी तिनं तयारी सुरु केली होती, असंही सांगण्यात येतंय. संशयित आरोपी कनोजिया यानं तिच्यावर अतिप्रसंग केल्याचं मानण्यात येत होतं. मात्र पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये बलात्कार झाला नसल्याचं समोर आल्यानंतर आता या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं आहे.

Web Title: Shocking information has come out in mumbai girls hostel girl murder case it is revealed that the girl was not raped the security guard committed suicide nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2023 | 07:26 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Girls Hostel
  • Mumbai
  • Rep

संबंधित बातम्या

MMRDA News: कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड
1

MMRDA News: कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
2

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला
3

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.