Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“दहशतवादाला सीमा नाही, सर्व देशांनी एकत्रित लढा देण्याची गरज”, श्रीकांत शिंदे यांचे लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेत सडेतोड भाषण

लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेला संबोधित करताना खासदार डॉ. शिंदे यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिका परखडपणे मांडली. या दौऱ्याच्या निमित्ताने पश्चिम आफ्रिकेतील दोन देशांच्या संसदेला संबोधित करण्याचा बहुमान मिळवला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 03, 2025 | 11:50 AM
श्रीकांत शिंदे यांचे लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेत सडेतोड भाषण

श्रीकांत शिंदे यांचे लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेत सडेतोड भाषण

Follow Us
Close
Follow Us:

मोनरोव्हिया, लायबेरिया : दहशतवाद सीमा ओलांडून पसरला आहे. भारताने सुरु केलेल्या दहशतवाद विरोधी मोहीमेत आता जगभरातील सर्व देशांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आलीय, असे सडेतोड मत भारतीय खासदांच्या शिष्टमंडळाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेला संबोधित करताना खासदार डॉ. शिंदे यांनी दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिका परखडपणे मांडली. या दौऱ्याच्या निमित्ताने सिएरा लिओन आणि लायबेरिया प्रजासत्ताक या पश्चिम आफ्रिकेतील दोन देशांच्या संसदेला संबोधित करण्याचा बहुमान मिळवणारे डॉ. श्रीकांत शिंदे हे एकमेव भारतीय खासदार ठरले आहेत.

“हिंदूंमध्ये दोन किंवा तीन लग्न म्हणजे गुन्हा नाही…; तेजच्या ‘प्रताप’ला त्यांच्याच पक्षातील खासदाराचे खुले समर्थन

यावेळी श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, भारत मागील काही काळापासून दहशतवादी हल्ल्यांनी आणि सीमापार दहशतवादाने त्रस्त आहे. या छुप्या दहशतवादाची वस्तुस्थिती सांगण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय खासदार येथे आलो आहोत. सर्व राष्ट्रांना दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत भारतासोबत उभे राहण्याची विनंती करत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जागतिक पातळीवर दहशतवादविरोधी शून्य सहिष्णुता राबवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे,अशी यावेळी शिंदे यांनी सांगितले.

लायबेरिया प्रजासत्ताक संसदेचे सभापती रिचर्ड नाग्बे कून आणि उपसभापती थॉमस पी. फल्लाह यांनी भारतीय शिष्टमंडळाचे स्वागत केले. सिनेटचे अध्यक्ष न्यूब्ली कारंगा लॉरेन्स यांच्यासोबत झालेल्या बैठकीत डॉ. शिंदे म्हणाले की, पाकिस्तानला बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) अर्थसहाय्य मिळत आहे. पाकिस्तानला ‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्येही टाकण्यात आले होते. मात्र सर्व दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये फोफावतात, त्यांना पाकिस्तानकडून पाठिंबा आणि प्रायोजित केले जाते. त्यामुळे यावेळीही भारताने पाकिस्तानचा ‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्ये समावेश करावा, अशी मागणी केल्याचे खासदार डॉ. शिंदे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, लायबेरियाच्या कठिण काळात भारताने नेहमीच सोबत केली. दोन्ही देशांचे खास संबंध आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य बनणाऱ्या लायबेरियाकडून दहशतवादाविरोधात आवाज उठवला जाईल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

खासदार डॉ. शिंदे आणि शिष्टमंडळाने सोमवारी (2 जून) लायबेरिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष जोसेफ न्युमा बोकाई तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्री साराह बेस्लो न्यान्ती यांच्याशी चर्चा केली. भारताच्या दहशतवाद विरोधी मोहीमाला लायबेरिया प्रजासत्ताकने भक्कम पाठिंबा दर्शवला असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. लायबेरिया प्रजासत्ताक संसदेचे सभापती रिचर्ड नाग्बे कून म्हणाले की, दहशतवादाशी सामना करण्यासाठी पश्चिम आफ्रिकेतील चार देशांची एकजूट महत्वाची आहे. सिनेट वरिष्ठ सभागृहाचे प्रो-टेम्पोर अध्यक्ष न्योनब्ली करंगा-लॉरेन्स यांच्या आदेशाने यावेळी लायबेरियाच्या संसदेत पहलगाम हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना दोन मिनिटं मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

लायबेरिया प्रजासत्ताकमध्ये भारतीय शिष्टमंडळाचे जंगी स्वागत

भारताने हाती घेतलेल्या दहशतवादविरोधी मोहीमेला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनुसार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील शेवटच्या टप्प्यात हे शिष्टमंडळ लायबेरिया प्रजासत्ताकची राजधानी मोनरोव्हियामध्ये रविवारी दाखल झाले. लायबेरिया सरकारच्या वतीने भारतीय शिष्टमंडळाचे जंगी स्वागत करण्यात आले. खासदार डॉ. शिंदे आणि शिष्टमंडळाने मोनरोव्हियामधील गुरुद्वाराला भेट दिली. तसेच लायबेरियातील भारतीय समुदायाला डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबोधित केले. भारताच्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यावेळी आभार मानले.

तोतया आर्मी ऑफिसर आर्मी वेल्फेअर हाऊसिंग स्कीमअंतर्गत करायचा फसवणूक; १८ वर्षे पोलिसांना दिला गुंगारा पण…

Web Title: Shrikant shinde speech in the parliament of the republic of liberia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 11:50 AM

Topics:  

  • india
  • maharashtra
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट
1

Real Estate : रिअल इस्टेट मार्केटला फटका, सप्टेंबरमध्ये घरांच्या विक्रीत १७% घट

Farmer Suicide:  १०७८६ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर
2

Farmer Suicide: १०७८६ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, NCRB ची धक्कादायक आकडेवारी समोर

Shivsena News : दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला मदतीचा हात
3

Shivsena News : दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला मदतीचा हात

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
4

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.