तोतया आर्मी ऑफिसर आर्मी वेल्फेअर हाऊसिंग स्कीमअंतर्गत करायचा फसवणूक; १८ वर्षे पोलिसांना दिला गुंगारा पण...
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल १८ वर्षांपासून फरार असलेल्या एका ७७ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. भारतीय लष्करातील कर्नल असल्याचे भासवून नागरिकांना बनावट आर्मी वेल्फेअर हाऊसिंग स्कीम अंतर्गत फ्लॅट आणि दुकाने देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करत होता. सीताराम सिंग अस या व्यक्तीचं नाव असून, तो हरियाणातील सिरसा येथे १९४८ मध्ये जन्मलेला आहे. त्याने पंजाब विद्यापीठातून इतिहास आणि अर्थशास्त्र विषयात एम.ए. केलं आहे. २००७ मध्ये तो जामिनावर सुटला होता, मात्र त्यानंतर कोर्टात अनुपस्थित राहून फरार झाला होता. तेव्हापासून तो पंजाबमधील पटियालामधील एका वृद्धाश्रमात लपून राहात होता.
Crime News: नारायणगावमध्ये पत्रकारावर भ्याड हल्ला; वृत्त संकलनासाठी गेला अन्…, नेमके प्रकरण काय?
२००७ मध्ये दिल्लीतील विवेक विहार पोलीस ठाण्यात अनिल निगम या बँक कर्मचाऱ्याने सिंगलाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. सिंगलाने त्याला आर्मी वेल्फेअर हाऊसिंग ऑर्गनायझेशन (AWHO) अंतर्गत फ्लॅट व दुकान देण्याचे आश्वासन देत ५६,००० रुपये घेतले होते. पैसे घेतल्यानंतर बनावट पावत्या दिल्या. या प्रकरणात सिंगलाला अटक झाली होती, पण तो जामिनावर सुटल्यावर पुन्हा हजर झाला नाही.
सिंगला लष्करात ठेकेदारी करत होता आणि विविध कॅन्टोन्मेंटमध्ये तेल पुरवठा करत असे. त्यामुळे त्याला लष्करी अधिकाऱ्यांचे हुद्दे, भरती प्रक्रिया आणि लष्करी योजनांची माहिती मिळाली. त्याचा गैरफायदा घेत त्याने स्वत:ला ‘कर्नल’ म्हणून भासवून लोकांना घरे व नोकऱ्या मिळवून देण्याचे आमिष दाखवले. पोलिसांनी सांगितले की, सिंगलाने फरार राहण्यासाठी आपल्या कुटुंबाशी सर्व संपर्क तोडला होता. त्याची पत्नी काही वर्षांपूर्वी निधन पावली असून त्याला दोन मुले आहेत. त्याने वृद्धाश्रमात राहत आपली ओळख लपवली होती.
“गाव विकणे आहे…”, असे काय घडले की लोकांना त्यांचे गाव विकावे लागले, नेमकं प्रकरण काय?
दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचला गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पटियालाच्या वृद्धाश्रमात सापळा रचून त्याला अटक केली. २६ एप्रिल २०२५ रोजी कडकडूम कोर्टाने त्याला ‘जाहिर गुन्हेगार’ (Proclaimed Offender) घोषित केले होते. DCP (Crime Branch) अपूर्वा गुप्ता यांनी सांगितले की, “सीताराम सिंगला आता पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.”