
Mamta Banerjee
Mamta Banerjee : दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनावरून आता देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. पोलिसांनी अभिजित दिपके आणि त्यांच्या साथीदारांना विमानातूनच ताब्यात घेतले. त्यानंतर मनात बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांसारख्या विरोधकांना देखील ताब्यात घेण्यात आले. यावरून देशभरात मोठ्या गदारोळाचे चित्र निर्माण झाले आहे.
अश्यातच पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या सोशल मीडिया पोस्टवर लिहत, आपल्यासोबत पाच खासदारांचे दिल्ली पोलिसांनी अपहरण करत सुमारे दोन तास प्रिझन व्हॅन मधून फिरवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडिया पोस्टमधून आपली भूमिका मांडली. द्वारका नॉर्थ पोलीस ठाण्यात आपल्यासोबत पाच खासदार धरणे आंदोलन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतर-मंतरवर जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी आपल्याला रोखलं आणि ताब्यात घेतलं, असा आरोपही त्यांनी केला.
त्या यावेळी म्हणाल्या, “संध्याकाळी ४ वाजले आहेत. आम्हाला ज्या ‘द्वारका नॉर्थ’ पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे, तिथे आमच्या ४ खासदारांसह आम्ही धरणे आंदोलन सुरू केले आहे. आम्हाला किडनॅप करून नेण्यात आले आणि दोन तास एका पोलीस व्हॅनमधून फिरवण्यात आले. मी आज रात्री कोलकाताला परतणार नाही; आणि आज तरुण व इतरांविरुद्ध जे काही घडत आहे, त्या निषेधार्थ मी सोमवारी होणाऱ्या ‘I.N.D.I.A’ आघाडीच्या मोर्चात सहभागी होईन.”
4pm. Along with our 4 MPs, we have started our dharna at Dwarka North PS where we have been brought. We were kidnapped and driven around in a prison van for two hours. I am not returning to Kolkata tonight and in protest against all that is happening today against the youth and all, I will join the I.N.D.I.A march on Monday. — Mamata Banerjee (@MamataOfficial) October 10, 2026
या कारवाईवरून ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थी, शेतकरी आणि महिलांशी संबंधित आंदोलनं दडपली जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
या घटनेच्या निषेधार्थ आपण शनिवारी रात्री कोलकाताला परतणार नसून पोलीस ठाण्यातच धरणे सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आंदोलनादरम्यान पाणीही न पिण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. गरज पडल्यास 48 ते 72 तास आंदोलन सुरू ठेवण्याची तयारी असल्याचंही त्या म्हणाल्या.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आणि SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतरवर आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, आंदोलनाला परवानगी नसल्याचं सांगत दिल्ली पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केल्याची माहिती आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जंतर-मंतरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे 1,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. CJP संस्थापक अभिजीत दीपके यांनीही विमानतळावर पोलिसांनी आपल्याला आणि सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे.
दिल्लीतील या कारवाईवरून विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं असून आंदोलनाचा अधिकार आणि पोलिसांच्या कारवाईबाबत नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.