Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात, सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात; ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत जोरदार आंदोलन

तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात ताब्यात ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या सुटकेसाठी आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब पोलीस ठाण्यात दाखल झाले.

  • By विवेक
Updated On: Oct 10, 2026 | 07:16 PM
Tushar Gandhi detained

Tushar Gandhi detained

Follow Us
Follow Us:
  • तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने ठाकरे गट आक्रमक
  • ‘सुटका होईपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही’; आदित्य ठाकरेंची भूमिका
  • डी. एन. नगर पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांची गर्दी
 

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दिल्लीत जंतर मंतर वर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरु होण्या आधीच अभिजित दिपके आणि त्यांच्या साथीदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले. अश्यातच आज सकाळीच मुंबई पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांना ताब्यात घेतले. यावरून आता शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना अंधेरी पश्चिम येथील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. या घटनेनंतर शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली असून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.

‘सुटका होईपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही’

तुषार गांधी यांना ताब्यात घेतल्याच्या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी पोलिसांसोबत चर्चा केली. जोपर्यंत तुषार गांधी यांना सोडलं जात नाही, तोपर्यंत आपण पोलीस ठाण्यातून बाहेर जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडल्याची माहिती आहे. यावेळी मुंबईतील शिवसैनिकही मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमतील, असं आदित्य ठाकरे यांनी पोलिसांना सांगितल्याचं वृत्त आहे. त्यामुळे डी. एन. नगर पोलीस ठाण्याबाहेर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Raj Thackeray : ‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत

संजय राऊत, अनिल परबही पोलीस ठाण्यात

तुषार गांधी यांच्या सुटकेसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब आणि इतर पदाधिकारीही पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तुषार गांधी यांना मागील सात ते आठ तासांपासून ताब्यात ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनापूर्वी मुंबईच्या विविध भागांत कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेता इम्रान खानलाही ताब्यात घेतलं

मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. अभिनेता इम्रान खान यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. दुसरीकडे, आंदोलनांवरील निर्बंधांवरून बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने सरकारवर टीका करत याला ‘अघोषित आणीबाणी’ असं संबोधलं आहे.

दिल्लीतील SIR विरोधी आंदोलन आणि मुंबईतील पोलिसांची कारवाई यामुळे हा मुद्दा आता चर्चेत आला आहे. तुषार गांधी यांच्या सुटकेसाठी ठाकरे गटाने घेतलेल्या भूमिकेनंतर पोलीस प्रशासन पुढे काय निर्णय घेतं, याकडे लक्ष लागलं आहे.

Mamta Banerjee : ‘आम्हाला किडनॅप केलं’ ममता बॅनर्जींचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, पोलीस ठाण्यातच केलं आंदोलन सुरु

Web Title: Aditya thackeray arived at tushar gandhi detention dn nagar police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 07:16 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • CJP Protest
  • sanjay raut
  • Tushar Gandhi

संबंधित बातम्या

CJP Protest : कॅाक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
1

CJP Protest : कॅाक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Mamta Banerjee : ‘आम्हाला किडनॅप केलं’ ममता बॅनर्जींचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, पोलीस ठाण्यातच केलं आंदोलन सुरु
2

Mamta Banerjee : ‘आम्हाला किडनॅप केलं’ ममता बॅनर्जींचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप, पोलीस ठाण्यातच केलं आंदोलन सुरु

CJP Protest : दिल्लीत धरपकड सुरूच; केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी, दिपके सगळ्यांनाच उचललं, 1,700 हुन जास्त आंदोलक ताब्यात
3

CJP Protest : दिल्लीत धरपकड सुरूच; केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी, दिपके सगळ्यांनाच उचललं, 1,700 हुन जास्त आंदोलक ताब्यात

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल
4

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.