Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारचा झटका, बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी रद्द केली सरकारची माफी; दोषींना पुन्हा तुरुंगात जावं लागणार!

सर्वोच्च न्यायालयानं बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या सुटकेला मंजूरी देणारा निकाल रद्द केला आहे. २००२ मध्ये गुजरात दंगलीत बिल्किस आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अमानुष छळ करण्यात आला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 08, 2024 | 11:57 AM
bilkis bano

bilkis bano

Follow Us
Follow Us:

गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरणी (Bilkis Bano Case) मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील दोषींच्या सुटकेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. न्यायाधीश बी.व्ही. नागरथना आणि उज्ज्वल भुयान खंडपीठांन हा निर्णय दिला आहे. सर्व 11 आरोपींचा सुटका आदेशही न्यायालयाने रद्द केला आहे.

[read_also content=”बांगलादेश निवडणुकीत शेख हसीना यांचा दणदणीत विजय, पाचव्यांदा पंतप्रधान होणार; प्रमुख विरोधी पक्षाचा निवडणुकीवर बहिष्कार https://www.navarashtra.com/latest-news/sheikh-hasina-re-elected-as-prime-minister-of-bangaladesh-for-5th-term-nrps-496044.html”]

बिल्किस प्रकरणातील 11 दोषींची झाली होती सुटका

ऑगस्ट 2022 मध्ये, गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सुटका केली होती. दोषींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिल्किसच्या दोषींना तुरुंगात जावे लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचं काय म्हणणं

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बीव्ही नागरथना आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने या खटल्याची 11 दिवस सुनावणी केली आणि ऑक्टोबरमध्ये निर्णय राखून ठेवला. सुप्रीम कोर्टाने 8 जानेवारीला रिलीज ऑर्डर रद्द केली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भविष्यात गुन्हे रोखण्यासाठी शिक्षा देण्यात येते जेणेकरुन गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळावी. पण पीडितेचं दु:ख सुद्धा लक्षात घ्यायला हवं. या प्रकरणाची आता कायदेशीर दृष्टीकोणातून तपासणी केली आहे. पीडितेची याचिका सुनावणीस योग्य असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, सर्वोच्च न्यायालयानेही दोषींच्या मुदतपूर्व सुटकेवर प्रश्न उपस्थित केले होते. न्यायालयाने म्हटले होते की ते शिक्षा माफीच्या विरोधात नाही, तर दोषी माफीसाठी कसे पात्र ठरले हे स्पष्ट केले पाहिजे.

बिल्कीस बाने प्रकरण नेमकं काय?

गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरण हे 2002 गुजरात दंगलीवेळचं आहे. गुजरात दंगलीदरम्यान (Godhra Hatyakand) दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रंधिकपूर गावात एका जमावानं बिल्किस बानो यांच्या घरात घुसून त्यांच्यावर अत्याचार केले. एवढंच नाहीतर त्यांच्या कुटुंबातील 7 जणांची हत्याही केली होती. या प्रकरणी 2008 साली मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं  11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नंतर मुंबई उच्च न्यायालयानं त्यांची शिक्षा कायम ठेवली. 15 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगल्यानंतर, या दोषींपैकी एकानं माफीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयानं गुजरात सरकारला या प्रकरणी निर्णय घेण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, गुजरात सरकारनं एक समिती स्थापन केली, ज्या समितीनं सर्व 11 दोषींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेतला. देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी या सर्व दोषींची निर्दोष सुटका करण्यात आली होती.

Web Title: Supreme court canceled order of releases of accuse in bilkis bano case nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2024 | 11:48 AM

Topics:  

  • Supreme Court

संबंधित बातम्या

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार
1

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
2

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?
3

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.