Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

या प्रकरणात आपला निर्णय देताना निवडणूक आयोगाने १९९४ च्या जनता दल प्रकरणाचा संदर्भ दिला, ज्याचा शिवसेना प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे, त्याचा सदर्भ देणे चुकीचे होते. जनता दल, समाजवादी पक्ष आणि शिवसेना यांच्या प्रकरणांमध्ये अनेक मतभेद आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 14, 2026 | 09:47 AM
Shiv Sena Name Symbol Election Commission,

Shiv Sena Name Symbol Election Commission,

Follow Us
Follow Us:
  • आयोगाने अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन शिंदे गटाला झुकते माप दिले.
  • शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र असतानाही त्यांना सत्ता स्थापनेची संधी दिली.
  • २०१८ च्या ज्या घटनेनुसार मंत्री झाले, त्याच पक्षाच्या घटनेला नंतर नकार दिला.
 

Shivsena Name Symbol Hearing: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (सीईसी) चुकीच्या निर्णयामुळे अपात्र एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे हे पक्षविरोधी आणि पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र असूनही, त्यांना केवळ आमदारांच्या संख्येच्या आधारावर मुख्यमंत्रिपद देण्यात आल्याचा धाडसी दावा त्यांनी केला आहे.  शिवसेनेच्या फुटीनंतर कोणताही वाद निर्माण झाला असता, पक्षाची नोंदणी रद्द करण्यात आली नाही उलट शिंदे यांना शिवसेनेचे नाव आणि चिन्ह देण्यात आले. निवडणूक आयोगाचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नव्हता, परंतु आयोगाने एकनाथ शिंदे यांना फायदा मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकारक्षेत्राची मर्यादा ओलांडली. शिवसेनेच्या नाव आणि चिन्हाच्या वादावर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी गुरुवारी सडेतोड युक्तिवाद मांडला.

पक्षबदलाच्या पापाला प्रोत्साहन देऊ नये

कपिल सिब्बल म्हणाले की, घटनात्मक तरतुदीचा अर्थ अशा प्रकारे लावला जाऊ शकत नाही, ज्यामुळे पक्षबदलाच्या पापाला प्रोत्साहन मिळेल. ते म्हणाले की, पक्षबदल रोखण्यासाठी बनवलेल्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे, सिब्बल यांनी विचारले की, जर एकनाथ शिंदे शिवसेनेची घटना वैध मानत नव्हते, तर त्यांनी २०१८ मध्ये आक्षेप का घेतला नाही? ते म्हणाले की, २०१८ च्या घटनेनुसार शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडून आले आणि मंत्रीही झाले. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे यांनी पक्षाच्या घटनेचे पालन करण्यास नकार दिला. हा एक गंभीर विरोधाभास आहे.

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावध राहा! घसरणीसह होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे संकेत

सिब्बल म्हणाले की, या प्रकरणात आपला निर्णय देताना निवडणूक आयोगाने १९९४ च्या जनता दल प्रकरणाचा संदर्भ दिला, ज्याचा शिवसेना प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे, त्याचा सदर्भ देणे चुकीचे होते. जनता दल, समाजवादी पक्ष आणि शिवसेना यांच्या प्रकरणांमध्ये अनेक मतभेद आहेत.

न्यायालयाने विचारले की शिवसेना म्हणजे काय आहे, संपूर्ण राजकीय पक्ष, कार्यकारिणी समिती की विधिमंडळ पक्ष. या प्रश्नावर उत्तर देताना कपिल सिबल म्हणाले की, शिवसेना म्हणजे केवळ एक राजकीय पक्ष. पक्षाचा कारभार चालवण्यासाठी विधिमंडळ पक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभा यांसारखे स्वतंत्र गट तयार केले जातात. शिवसेना ही एक नियम पाळणारी संघटना आहे, जिथे प्रत्येक लहान-मोठा बदल लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम २९अ अंतर्गत निवडणूक आयोगाला कळवला जातो.

Shiv Sena Symbol Case : निकालानंतर रडण्यासाठी वातावरण निर्मिती ;शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची उबाठा गटावर खरमरीत टीका

पक्षाच्या नियमांनुसार, केवळ राष्ट्रीय कार्यकारिणीलाच ‘पक्षप्रमुख’ निवडण्याचा अधिकार आहे. या आधारावर सिबल यांनी असा युक्तिवाद केला की, बंडखोर गटाने कोणत्याही लोकशाही प्रक्रियेचे पालन न करता पक्षप्रमुखाला हटवून अध्यक्षपद बळकावले, जे शिवसेनेच्या घटनेचे थेट उल्लंघन होते.

 

 

 

Web Title: Supreme court shiv sena symbol case kapil sibal arguments against eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kapil sibal
  • shivsena
  • Supreme Court
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद
1

Shiv Sena Symbol Case: ‘२०१८ ची शिवसेना पक्षघटना मान्य नव्हती तर…’, कपिल सिब्बल यांचा शिंदे गटावर जोरदार युक्तिवाद

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही बेकायदेशीर? कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद
2

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णयही बेकायदेशीर? कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद

शिवसेना चिन्हाच्या सुनावणीत कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का?
3

शिवसेना चिन्हाच्या सुनावणीत कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का?

Maharashtra Politics: ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी राऊतांचे षडयंत्र’ , नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट
4

Maharashtra Politics: ‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी राऊतांचे षडयंत्र’ , नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.