टाटा सन्सकडून (Tata Sons) एअर इंडियामध्ये (Air India) अनेक बदल केले जात आहेत. सोमवारी टाटा सन्सने इल्कर आयसी यांना (Ilkar IC Appointed As New CEO And MD Of Air India) एअर इंडियाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) म्हणून नियुक्त केले आहे. इल्कर आयसींची नियुक्ती सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीदरम्यान करण्यात आली. टाटा सन्सकडून एका परिपत्रकाद्वारे या नियुक्तीबाबत कळवण्यात आलं आहे. कंपनीने म्हटलं आहे की, खूप चर्चा करुन आम्ही इल्कर आयसी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) या संचालक मंडळाच्या बैठकीत खास आमंत्रित सदस्य होते.
Tata Sons appoints Ilker Ayci as CEO & MD of Air India pic.twitter.com/HuGfJ82B9d — ANI (@ANI) February 14, 2022
इल्कर हे ५१ वर्षांचे आहेत. त्यांना २०१५ मध्ये टर्कीश एअरलाइन्सचे चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले होते. आयसी यांची विमान उद्योगात स्वत:ची अशी खास ओळख आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात टर्कीश एअरलाइन्सला खूप यश मिळवून दिले. टाटा सन्सने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, इल्कर यांचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे. ते एअर इंडियाला नव्या युगामध्ये घेऊन जातील.
[read_also content=”पुलवामा हल्ल्याला ३ वर्ष पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली https://www.navarashtra.com/india/prime-minister-narendra-modi-and-defence-minister-rajnath-singh-paid-tribute-to-the-martyrs-of-pulwama-attack-nrsr-238266/”]
गेल्या २७ जानेवारी २०२२ ला एअर इंडियाचे अधिकार टाटा सन्सला बहाल करण्यात आले. टाटा ग्रूपने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेससोबत एअर इंडिया आणि एआयएसएटीएसमध्ये ५० टक्के हिस्सा मिळवण्यासाठी बोली लावली होती. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडने ८ ऑक्टोबर २०२१ ला कर्जामध्ये बुडालेल्या एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी १८,००० कोटी रुपयांची बोली लावली होती.






