Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telangana Accident : तेलंगणामध्ये भीषण अपघात, ७० जणांना घेऊन जाणारी बस ट्रकला धडकली, २० जणांचा मृत्यू

Telangana Accident News: तेलंगणातील रंगारेड्डी येथे बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात 20 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 12 हून अधिक प्रवासी जखमी आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 03, 2025 | 11:26 AM
तेलंगणामध्ये भीषण अपघात, ७० जणांना घेऊन जाणारी बस ट्रकला धडकली, २० जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य-X)

तेलंगणामध्ये भीषण अपघात, ७० जणांना घेऊन जाणारी बस ट्रकला धडकली, २० जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • भरधाव डंपरची एका आरटीसी बसला धडक
  • भीषण धडकेत 20 जणांचा खडीखाली दबून मृत्यू
  • बस तंदूरहून हैदराबादला जात होती
Telangana Accident News Marathi : तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल येथे भीषण अपघात झाल्याची घटना घडली. 70 हून अधिक प्रवासी असलेल्या बसची ट्रकला धडकल्यामुळे हा अपघात घडला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात मृतांचा आकडा २० वर पोहोचला आहे. तर जखमींची संख्या 12 हून अधिक आहे. या भीषण रस्ते अपघातात टिप्पर चालकाचाही मृत्यू झाला आहे. हैदराबाद-विजापूर महामार्गावर चेवेल्ला मंडलमधील मिर्झागुडाजवळ तंदूर डेपोहून येणारी आरटीसी बस थेट खडी भरलेल्या टिप्पर ट्रकला धडकल्यामुळे हा अपघात घडला असल्याची माहिती मिळत आहे. बस आणि टिप्पर ट्रकची धडक इतकी भीषण होती की, टिप्पर ट्रकमधील खडी बसमध्ये पडली आणि अनेक प्रवासी अडकले. टिप्पर चालकाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये ७० हून अधिक प्रवासी होते.

SIR ‘वरून राजकारण तापणार; तामिळनाडूचे मुख्यमंत्र्यांसह ४८ पक्ष सर्वोच्च न्यायालयात जाणार

जखमींना रुग्णालयात दाखल

या धडकेमुळे बसमध्ये गोंधळ उडाला आणि अनेक प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले आणि जखमींना बाहेर काढून चेवेल्ला येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक निर्देश दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य कोणत्याही परिस्थितीत जलदगतीने पूर्ण केले पाहिजे आणि जखमींना सर्वोत्तम उपचार दिले पाहिजेत.

मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनानुसार, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेलंगणाचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक (डीजीपी) यांना अपघातात जखमी झालेल्या सर्व जखमींना तात्काळ हैदराबादमधील रुग्णालयात हलवण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींवर उपचारांची कमतरता भासू नये आणि त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात याची खात्री करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती ठेवण्याचे आणि अपघाताबाबत सतत अपडेट देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी घटनास्थळाजवळील मंत्र्यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रशासनाला सर्व शक्य ती मदत पुरवण्यासाठी तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. सीएम रेड्डी यांनी रंगारेड्डी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्य अधिक वेगवान करण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून बाधित लोकांना त्वरित आणि प्रभावी मदत मिळू शकेल.

Bihar Elections 2025: UP मध्ये नेत्यांच्या मुलींची जोरदार हवा! RJD-JDU पासून BJP पर्यंत सर्वच पक्षात परिवारवाद

Web Title: Telangana rangareddy bus accident 20 people dead revanth reddy order to officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 11:26 AM

Topics:  

  • india
  • Telangana

संबंधित बातम्या

एका रात्रीत उभारली गेली अशी भारतातील रहस्यमय मंदिरे, आजही भाविकांना चकित करतात यांच्या कथा
1

एका रात्रीत उभारली गेली अशी भारतातील रहस्यमय मंदिरे, आजही भाविकांना चकित करतात यांच्या कथा

Amit Shah : नाशिकमधील २५ गावांतील ९,००० एकर जमिनीवर होणार वनीकरण, अमित शाहा यांची महत्त्वाची घोषणा
2

Amit Shah : नाशिकमधील २५ गावांतील ९,००० एकर जमिनीवर होणार वनीकरण, अमित शाहा यांची महत्त्वाची घोषणा

Saudi Vision 2030: सौदी अरेबियात भारतीय कामगारांची चांदी; एक महिन्याची सुट्टी अन् व्हिसा जप्तीवर बंदी, पाहा संपूर्ण यादी
3

Saudi Vision 2030: सौदी अरेबियात भारतीय कामगारांची चांदी; एक महिन्याची सुट्टी अन् व्हिसा जप्तीवर बंदी, पाहा संपूर्ण यादी

DefenseNews : ड्रोन युगाचा थरार! बंकरमध्ये घुसून मारणार भारताचे 850 ‘kamikaze’ ड्रोन; ₹2,000 कोटींचा करार
4

DefenseNews : ड्रोन युगाचा थरार! बंकरमध्ये घुसून मारणार भारताचे 850 ‘kamikaze’ ड्रोन; ₹2,000 कोटींचा करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.