तेलंगणा राज्यात कॉंग्रेस सरकार अडचणीत? (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
तेलंगणा: काँग्रेस पक्ष सध्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहे. राहुल गांधी आणि अन्य ज्येष्ठ नेते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. मात्र तेलंगणामध्ये सरकारचा गेम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार धोक्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. याला कारण म्हणजे काँग्रेसच्या 10 आमदारांनी गुप्त बैठक केली असल्याचे समोर आले आहे.
आमदार अनिरुद्ध रेड्डी यांच्या निवासस्थानी 10 आमदारांची बैठक पार पडली असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पक्षात सगळे आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. आमदारांनी गुप्त बैठक केल्याने काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर 10 आमदारांनी गुप्त बैठक केल्याने मुख्यमंत्री रेड्डी आणि कॉंग्रेस हायकमांड यांची चिंता वाढली आहे.
मुख्यमंत्री रेड्डी यांनी डॅमेज कंट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सर्व आमदारांची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना तेलंगणमध्ये ऑपरेशन लोटसची देखील चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे तेलंगणा येथील कॉंग्रेस सरकार संकटात सापडले आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. नाराज झालेले आमदार हे सरकारमधील काही मंत्र्यांमुळे नाराज असल्याची चर्चा आहे.
तेलंगणामध्ये मुख्यमंत्री रेड्डी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 10 आमदारांनी गुप्त बैठक केली आहे. या आमदारांमध्ये नाराजी आहे. काही मंत्र्यांमुळे हे आमदार नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्याबद्दलची तक्रार कॉँग्रेस हायकमांडकडे देखील करण्यात आली आहे. जर का या 10 आमदारांनी आपला पाठिंबा काढला तर सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे.
दिल्ली विधनसभा निवडणुकीत राहुल गांधी यांची केजरीवाल यांच्यावर टीका
कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी बोलताना म्हणाले, “आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ‘वॅगनआर’ गाडीने राजकारणात आले आणि ‘शीशमहल’च्या पार्किंगमध्ये गेले. राहुल गांधी दिल्लीच्या मादीपूरमध्ये राहुल गांधी यांनी प्रचार सभेला संबोधित केले.
हेही वाचा: Rahul Gandhi On Kejriwal: “वॅगनआर घेऊन राजकारणात आले अन्…”; राहुल गांधींची केजरीवालांवर बोचरी टीका
राहुल गांधी म्हणाले, “केजरीवाल आणि नरेंद्र मोदी हे आपल्या भाषणात खोटे बोलते. मे अशीच वचने देतो जी मी पूर्ण करू शकतो. आम्ही मनरेगा योजना, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, दिल्लीत फ्लायओवर बांधले, विकासकामे केली. पण खोटी वचने दिली नाहीत. ” विरोधकांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानाला शीशमहल असे नाव दिल्याचे म्हटले जाते. केजरीवाल यांनी त्यांच्या घराच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप केला जातो. केजरीवाल फक्त खोटी आश्वासने देतात असा आरोप राहुल गांधी यांनी केला.