
Terrorist base planning meeting funded in Delhi's Al Falah University red fort blast
Red Fort Blast : नवी दिल्ली: लाल किल्ला परिसरामध्ये सोमवारी (१० नोव्हेंबर) संध्याकाळी बॉंम्बस्फोट झाला. यामध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाची चौकशी करणाऱ्या एजन्सींने एका विद्यापीठाचे कनेक्शन शोधून काढले. दिल्लीतील ‘अल फलाह युनिव्हर्सिटी’ ही दहशतवादी अड्डा बनत चालले असल्याचे समोर आले आहे.
अल फलाह विद्यापीठातील त्यांच्या खोल्यांमध्ये दहशतवादाचा कट शिजत असल्याचे दिसून आले आहे. या विद्यापीठामध्ये डॉ. उमर नबी आणि डॉ. मुझम्मिल यांच्या डायरी जप्त केल्या आहेत. फरीदाबादमधील सुमारे ७० एकर जागेवर पसरलेले हे विद्यापीठ आता दहशतवादी केंद्र म्हणून उदयास आले आहे, जिथे दहशतवाद्यांनी केवळ योजना आखल्या नाहीत तर अनेक गुप्त बैठका घेतल्या आणि दहशतवादी हल्ले करण्यासाठी निधीची व्यवस्था केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मीडिया रिपोर्टनुसार, “या डायऱ्या मंगळवार आणि बुधवारी अल फलाह विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जप्त करण्यात आल्या. त्यापैकी एक डॉ. उमरच्या खोली क्रमांक चारमधून आणि दुसरी डॉ. मुझम्मिलच्या खोली क्रमांक १३ मधून जप्त करण्यात आली. डॉ. मुझम्मिलचा खोली क्रमांक १३ आता सील करण्यात आला आहे आणि तेथून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि पेन ड्राइव्ह देखील जप्त करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, पोलिसांनी डॉ. मुझम्मिल वापरत असलेल्या दुसऱ्या खोलीतून एक डायरी जप्त केली आहे. ही तीच जागा आहे जिथे पूर्वी ३६० किलोग्रॅम स्फोटके जप्त करण्यात आली होती. ही खोली विद्यापीठापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर आहे.
रूम क्रमांक १३ चे रहस्य
पोलिस सूत्रांनी सांगितले की, “जप्त केलेल्या डायऱ्या आणि नोटबुकमध्ये कोड शब्द आहेत, ज्यामध्ये ८ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर दरम्यानच्या तारखा नमूद आहेत. डायरीमध्ये “ऑपरेशन” हा शब्द अनेक वेळा उल्लेख आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, डॉ. उमर आणि त्याचे सहकारी अल फलाह विद्यापीठाच्या इमारत क्रमांक १७ मध्ये गुप्तपणे भेटत असत. या इमारतीतील खोली क्रमांक १३ ही डॉ. मुझम्मिलची होती, जिथे दहशतवादी अनेकदा भेटत असत.” पोलिसांना संशय आहे की याच खोलीत या सर्वांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या विविध भागात बॉम्बस्फोट घडवण्याची योजना आखली होती.
दिल्ली बॉम्बस्फोटाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
२६ लाखांहून अधिक रुपये जमा
सूत्रांनी असेही म्हटले आहे की “व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल” शी संबंधित अटक केलेल्या डॉक्टरांनी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात वापरलेले साहित्य खरेदी करण्यासाठी २६ लाखांहून अधिक रुपये जमा केले होते. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, डॉ. मुझम्मिल गनई, डॉ. अदील अहमद रघधर, डॉ. शाहीन सईद आणि डॉ. उमर नबी या चार संशयितांनी संयुक्तपणे ही रोकड गोळा केली होती, जी सुरक्षित ठेवण्यासाठी आणि पुढील वापरासाठी डॉ. उमर याला देण्यात आली.