Delhi Bomb Blast : दहशतवादी मसूद अझहरनेच रचला दिल्लीचा कट? त्याच्या सूनेच्या थेट संपर्कात होती डॉ. शाहीन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Bomb Blast News: दिल्ली बॉम्बस्फोटनंतर काश्मीर हाय अलर्टवर! 500 हून जास्त ठिकाणांवर छापेमारी
तपास यंत्रणेच्या प्राथमिक तपासानुसार शाहीन दहशतवादी मसूद अझहरच्या पुतण्या आफिराहची पत्नी अफिरा बीबीच्या संपर्कात असल्याचे आढळून आले आहे. तपास यंत्रणांना माहिती मिळाली आहे की, शाहीन आफिराच्या इशाऱ्यावरुन भारतात जमात अल-मोमिनतचे जाळे पसरवत होती. आफिराच्या सांगण्यावरुन थेट भारतातील महिलांना दहशतावादाचे प्रशिक्षण दिले जात होते.
जमात-ए-मोमनित ही मसूदच्या बहिणीची दहशतवादी संघटना आहे. ही संघटना जैश-ए-मोहम्मदच्या महिला संघटनेचा भाग आहे. सांगितले जात आहे की, आफिराह शाहीनवर लक्ष ठेवून होती. पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये अलीकडे आफिराने जैशची एक महिला संघटाना स्थापन केली होती. यामध्ये नुकतेच सदस्यांची भरती देखील करण्यात होती. शाहीनला या लोकांना इस्लामिक कट्टरपंथी बनवणे आणि त्यांना इतर धर्माविरोधात भडकवण्याची जबाबदारी आफिराहने दिली होती. जमात-ए-मोमिनचा भारतात विस्तार करणे याचा उद्देश होता.
आफिराह ही मसूद अझहरचा पुतण्या उमर फारुकची पत्नी आहे. उमर फारुक हा पुलवामा हल्ल्यातील आरोपी होती, जो त्यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या चकामकीत मारला गेला. उमरच्या हत्येनंतरच आफिराग दहशतवादी गटात सामील झाली. शिवाय मसूदची बहिमी देखील आफिराहच्या कामाता साथ देत होती. भारतात दहशतवादाचे जाळे उभारण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु होता. यामध्ये विशेष करुन महिलांचा समावेश केला जात होता.
दिल्ली बॉम्बस्फोट एवढा भयंकर होता की, मृतांच्या शरिराचे तुकडे तुकडे झाले होते. मृतांची ओळख पटवणे देखील कठीण झाले होते. या स्फोटाने संपूर्ण देश हादरला होता. देशाच्या अनेक प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला. सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. या स्फोटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील खळबळ उडाली होती. या घटनेचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे पाहून अंगावार काटा येईल.






