श्रीनगर : जम्मू-काश्मिरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांविरोधात (Terrorist) कारवाई (Action) सुरू आहे. कुपवाडा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी आणखी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे आतापर्यंत एकूण चार दहशतवादी मारले गेले आहेत. रविवारी झालेल्या गोळीबारात दोन पाकिस्तानी दहशतवादी (Pakistani Terrorist) ठार झाले आहेत. तर, कुपवाडा व्यतिरिक्त कुलगाम आणि पुलवामा या भागातही चकमकी झाल्या आहेत.
गेल्या १८ तासांत तीन चकमकीत सात दहशतवादी मारले गेले आहेत. कुपवाडामध्ये लष्कर-ए-तोयबाचे (Lashkar-E-Taiba) चार, कुलगाममध्ये जैश-ए-मोहम्मदचे (Jaish-E-Mohammed) दोन आणि पुलवामामध्ये एक दहशतवादी मारला गेला आहे. घटनास्थळावरून शस्त्रास्त्र आणि दारूगोळा यांसह व्यतिरिक्त आक्षेपार्ह साहित्यही जप्त करण्यात आले असून सध्या शोध मोहीम अजूनही सुरू आहे. याशिवाय, कुलगाम आणि पुलवामामध्ये रविवारपासून तीन दहशतवादी मारले गेले आहेत.
पोलीस महानिरीक्षक (काश्मीर) विजय कुमार यांनी सांगितले की, कुपवाडा येथे ठार झालेल्या एका दहशतवाद्याची ओळख पाकिस्तानी नागरिक म्हणून झाली असून, त्याचे लष्कर-ए-तौयबाशी संबंध होते. दुसरा दहशतवादीही लष्करचा असल्याचे सांगण्यात येत आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी शौकत अहमद शेखकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी कुपवाडाच्या लोलाब भागात ऑपरेशन सुरू केले. त्याचवेळी चकमक सुरू झाली. यावेळी, लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर, दुसरी चकमक दक्षिण काश्मिरातील कुलगाममधील दामहाल हांजी पुरा भागात झाली, तिथे दोन दहशतवादी मारले गेले आहेत.