आज शेवटच्या टप्प्यात 57 जागांसाठी मतदान होत आहे. लोकसभा निवडणूक-2024 च्या सातव्या आणि अंतिम टप्प्यामध्ये शनिवार (1 जून) 7 राज्ये आणि 1 केंद्र शासित प्रदेश अशा 57 जागांसाठी मतदान सुरु आहे. निवडणूक आयोगाच्या व्होटर टर्नआउट ॲपनुसार दुपारी ३ वाजेपर्यंत ४९.६८ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक 58.41% मतदान हिमाचल प्रदेशात झाले आणि सर्वात कमी 42.95% मतदान बिहारमध्ये झाले आहे.
शेवटच्या टप्प्यात कोणत्या जागांवर मतदान?
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 57 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यामध्ये बिहारमधील 8, चंदीगडमधील 1, हिमाचल प्रदेशातील 4, झारखंडमधील 3, ओडिशातील 6, पंजाबमधील 13, उत्तर प्रदेशमधील 13 आणि पश्चिम बंगालमधील 9 जागांचा समावेश आहे. ओडिशा राज्य विधानसभेच्या उर्वरित 42 जागांसाठीच मतदान होत आहे.