Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…तर आम्ही दिल्लीतील रस्ते प्रियंका गांधींच्या गालांप्रमाणे बनवून दाखवू; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

काँग्रेस प्रवक्ते पवन खेड़ा यांनी रमेश बिधूडी यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, “ही केवळ या खालच्या पातळीच्या माणसाची मानसिकता नाही तर त्यांच्या वरिष्ठांचे खरे स्वरूप आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 05, 2025 | 04:11 PM
…तर आम्ही दिल्लीतील रस्ते प्रियंका गांधींच्या गालांप्रमाणे बनवून दाखवू; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली:  दिल्ली विधानसभा निवडणुकांबाबत वातावरण तापले आहे. आप आणि काँग्रेसनंतर आता भाजपनेही आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यासोबतच रोज राजकीय वादविवाद आणि विधानांची मालिका पाहायला मिळत आहे. कालकाजी विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार रमेश बिधूडी यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे, ज्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

एका कार्यक्रमादरम्यान रमेश बिधूडी म्हणाले की, “लालू यादव खोटं बोलायचे की ते बिहारच्या रस्त्यांना हेमा मालिनी यांच्या गालांप्रमाणे बनवतील. पण ते तसं करू शकले नाहीत. मात्र, मी तुम्हाला आश्वस्त करतो की, कालकाजी सुधार शिबिरासमोरील आणि आतील सर्व रस्ते प्रियंका गांधी यांच्या गालांप्रमाणे बनवून दाखवू.”

Manoj Jarange news: चुलत भावाचे निधन; मनोज जरांगे पुण्यातील मोर्चा सोडून जालन्याला रवाना

त्यानंतर त्यांनी पुढे सांगितलं की, “जसं ओखला आणि संगम विहारमधील रस्ते तयार केले तसेच कालकाजीचे रस्ते तयार करू.” बिधूडी यांच्या या वादग्रस्त विधानावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे, आणि याच विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हे वर्तन खालच्या पातळीचे – पवन खेड़ा

काँग्रेस प्रवक्ते पवन खेड़ा यांनी रमेश बिधूडी यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, “ही केवळ या खालच्या पातळीच्या माणसाची मानसिकता नाही तर त्यांच्या वरिष्ठांचे खरे स्वरूप आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार भाजपच्या अशा नेत्यांमध्ये दिसून येतात.”

१८ पैकी १५ शहरं, मुख्य लष्करी मुख्यालयावर कब्जा ; बांगलादेशनंतर भारताच्या शेजारी बनतो

भाजपचे खरे रूप – सुप्रिया श्रीनेत

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी बिधूडी यांच्या विधानाला महिलाविरोधी ठरवलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, “प्रियंका गांधी यांच्याबाबत रमेश बिधूडी यांनी दिलेलं विधान केवळ लाजिरवाणं नाही, तर त्यांची महिलांविषयीची नीच मानसिकता दर्शवते. पण ज्या व्यक्तीने संसदेत आपल्या सहकारी खासदाराला नालस्ती केली आणि त्याला कोणतीही शिक्षा झाली नाही, त्याच्याकडून दुसरं काय अपेक्षित असणार?”

त्यानंतर त्यांनी भाजपवर निशाणा साधत लिहिलं की, “हे भाजपचे खरे रूप आहे. भाजपच्या महिला नेत्या, महिला आणि बालविकास मंत्री, नड्डा साहेब किंवा स्वतः पंतप्रधान या खालच्या दर्जाच्या भाषा आणि विचारांवर काही बोलतील का? प्रत्यक्षात, महिला विरोधी विचारांचा पाया मोदींनीच घातला आहे. त्यामुळे त्यांच्या नेत्यांकडून दुसरं काय अपेक्षा ठेवायची? या नीच विचारांसाठी माफी मागावी.”

Web Title: Then we will make the roads of delhi look like priyanka gandhis cheeks bjp leaders controversial statement nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 04:11 PM

Topics:  

  • BJP
  • Priyanka Gandhi

संबंधित बातम्या

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक
1

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
3

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
4

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.