Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात

सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे शपथविधी सोहळा बुधवार किंवा गुरुवारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 17, 2025 | 01:24 PM
Bihar Assembly Election 2025:

Bihar Assembly Election 2025:

Follow Us
Close
Follow Us:
  • बिहारमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग
  • नितीश कुमार आज राजीनामा देणार
  • सम्राट चौधरींचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात

Bihar Politics: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतर आता राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीपूर्वी, भाजप आणि जेडीयूने समान जागांवर (१०१) उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला होता. यात भाजपच्या ८९ जागा तर जेडीयूच्या ८५ जागा निवडून आल्या. या विजयानंतर बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूने सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सरकार स्थापनेच्या सूत्रानुसार, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास पासवान) दोन मंत्रीपदे, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) एक आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाला एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana Update: …तर लाडकी बहीण योजेनेचे  पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनडीए घटक पक्षांमध्ये सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरू आहे आणि अनेक माजी मंत्र्यांच्या खात्यांचाही विचार केला जात आहे.निवडणूक निकालानंतर आज जेडीयूची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपालांना भेटून राजीनामा देण्यची शक्यता निर्माण वर्तवण्यात येत आहे. तर मंगळवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक अपेक्षित आहे.

यावेळीच्या जागा — पुन्हा ‘२०२० फॉर्म्युला’!

२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकत आघाडी घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावर जेडीयू असून त्यांनी ८५ जागा जिंकल्या. एलजेपी (आरएलडी) ला १९, एचएएम (एस) ला ५ आणि आरजेडीला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. २०२० मध्ये भाजपने ७४ तर जेडीयूने ४३ जागा जिंकल्या होत्या. त्या वेळी सरकारमध्ये भाजपचे २२ आणि जेडीयूचे १२ मंत्री होते.

नवीन सरकार कधी शपथ घेणार?

सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे शपथविधी सोहळा बुधवार किंवा गुरुवारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी सरकार स्थापनेबाबत प्राथमिक चर्चा केली.

Earthquake In Ladakh: लडाखमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के! शेजारी देशही हादरला, किती झाले नुकसान?

सम्राट चौधरींचे पद ‘धोक्यात’?

नितीश कुमार हे दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता आहे. मात्र, उपमुख्यमंत्रीपदाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यावरचे भ्रष्टाचारासंबंधी आरोप आणि उमेदवारी अर्जातील अनियमितता यामुळे त्यांची पुनर्नियुक्ती होईल की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे.

शपथविधी गांधी मैदानात?

नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पाटण्यातील गांधी मैदानात होण्याची दाट शक्यता आहे. २०१५ मध्येही नितीश कुमार यांनी याच मैदानात शपथ घेतली होती. १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान गांधी मैदान सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले असून शपथविधीसाठी भव्य स्टेज उभारण्याची तयारी सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बिहारमध्ये कोणत्या पक्षांना सर्वाधिक जागा मिळाल्या?

    Ans: भाजपने ८९ जागा जिंकून आघाडी घेतली, तर जेडीयूने ८५ जागा जिंकल्या.

  • Que:  एनडीए सरकार स्थापनेसाठी कोणकोणते पक्ष सहभागी आहेत?

    Ans: एनडीएमध्ये भाजप, जेडीयू, लोक जनशक्ती पक्ष (रामविलास), हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा हे घटक पक्ष सहभागी आहेत.

  • Que:  नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

    Ans: होय, नितीश कुमार हे दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Bihar politics nitish kumars cabinet formula revealed big leaders chair in danger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 01:24 PM

Topics:  

  • bihar assembly election 2025
  • BJP
  • JDU
  • Nitish Kumar

संबंधित बातम्या

Bihar Politics: रोहिणी आचार्य यांच्यापाठोपाठ लालू प्रसाद यादव यांच्या तिन्ही मुलींनी सोडले राबडी निवास
1

Bihar Politics: रोहिणी आचार्य यांच्यापाठोपाठ लालू प्रसाद यादव यांच्या तिन्ही मुलींनी सोडले राबडी निवास

Bihar Election 2025: ‘काल एका मुलीचा अपमान…’; अवघ्या २४ तासात रोहिणी आचार्य यांच्या दुसऱ्या पोस्टने खळबळ
2

Bihar Election 2025: ‘काल एका मुलीचा अपमान…’; अवघ्या २४ तासात रोहिणी आचार्य यांच्या दुसऱ्या पोस्टने खळबळ

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana Bihar: 10 हजार रुपयांच्या योजनेमुळे बदलले बिहारचे राजकीय गणित? नितीश कुमारांची गेम-चेंजर योजना!
3

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana Bihar: 10 हजार रुपयांच्या योजनेमुळे बदलले बिहारचे राजकीय गणित? नितीश कुमारांची गेम-चेंजर योजना!

Bihar Election 2025: नितीश अडले, भाजपाला नडले; बिहारात नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर
4

Bihar Election 2025: नितीश अडले, भाजपाला नडले; बिहारात नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.