Photo Credit- Social Media
बीड: बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्ह पुण्यात सर्वपक्षीय निशेष मोर्चा काढण्यात आला होता. सर्वपक्षीय नेत्यांसोबतच या मोर्चाला संतोष देशमुख यांचंही कुटुंब दाखल झाले आहे. त्याचबरोबर या प्रकरणाच्या निषेधार्ह आतापर्यंत जेवढे मोर्चे झाले, त्या मोर्चाला मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील उपस्थित होते. या मोर्चाच्या माध्यमातून संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली. पण अचानक जरांगे पाटलांना हा मोर्चा अर्धवट सोडून जालन्याला जावं लागलं. मिळालेल्या माहितीनुसार, मनोजजरांगे पाटील यांच्या चुलत भावाचे अपघाती निधन झाल्यामुळे त्यांना हा मोर्च अर्धवट सोडून जालन्याला जावं लागलं. उद्या त्यांच्या अत्यंविधीला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी तातडीने पुणे सोडलं आणि जालन्याकडे रवाना झाले.
बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घुणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये दिरंगाई केल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या प्रकरणामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये जरांगे पाटील सहभागी झाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले होते.
Big Breaking: भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले; 3 जणांचा मृत्यू, गुजरातमधील घटना
मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणातील मास्टर माईंड आरोपी वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्यामध्ये संबंध असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यामध्ये धमकवले जात असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना धमकी दिली होती. असे केले तर रस्त्यावर फिरु देणार नाही, अशी धमकी मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. त्यावर लक्ष्मण हाके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आम्ही न्यायासाठी हे आंदोलन करत आहोत. एका लेकीन बाप गमावलाय. लेकीला न्याय पाहिजे. त्यामुळे राज्यभर समाज रस्त्यावर उतरला आहे. आता यातून सुट्टी नाही. धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शांत राहा शांत राहा असं सांगत जाणून-बुजून त्यांनी हे केले. संतोष देशमुखांचा खून करून त्यांचं पोट भरलं नसेल तरी लोक न्यायसाठी रस्त्यावर येणार आहेत, असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.
तरुणांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले; ‘त्या’ चॅटच्या नादी लागू नकाच, अडचणीतच याल
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकऱणात वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी कार्यालयात सरेंडर केल्यानंतर आणखी तीन जणांना पुण्यातूनच ताब्यात घेण्यात आले, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांना सुरूवातील अटक कऱण्यात आली होती. त्यानंतर 22 दिवसांनी वाल्मिक कराडने पुणे सीआयडी कार्यालयात सरेंडर केले. पण तरीही या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हेदेखील गेल्या 25 दिवसांपासून फरार होते. वाल्मिक कराडसह सीआयडीचे पथक या तिघांचाही शोध घेत होते. त्यातील आता सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली आहे. पण कृष्णा आंगळे अद्यापही फरार आहे. वाल्मिक कराडसह या सर्वांना 14 दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांची सीआयडी चौकशीही सुरू आहे.