Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Schemes For Women: महिला उद्योजकांसाठी सुवर्णसंधी; ‘या’ ३ सरकारी योजना देणार १० लाखांपासून ५० लाखांपर्यंत मदत

देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारची 'पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम' (PMEGP) ही योजना अत्यंत प्रभावी ठरत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 25, 2026 | 04:28 PM
Mudra Loan for Women, PMEGP Scheme 2026, Business Loans for Women, Small Business Ideas, Women Empowerment Schemes,

Mudra Loan for Women, PMEGP Scheme 2026, Business Loans for Women, Small Business Ideas, Women Empowerment Schemes,

Follow Us
Close
Follow Us:
  • महिला केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्यांपर्यंत मर्यादित राहिलेल्या नाहीत.
  • भारतात महिला उद्योजकता वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध आर्थिक योजना
  • केंद्र सरकारची ‘पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (PMEGP) ही योजना अत्यंत प्रभावी
Schemes For Women: आजच्या काळात महिला केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्यांपर्यंत मर्यादित राहिलेल्या नाहीत. कौटुंबिक जबाबादाऱ्यांसह त्या आता उद्योग आणि व्यवसायातही स्वत:ची ओळख निर्माण करत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. भारतात महिला उद्योजकता वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध आर्थिक योजना राबवल्या जात आहेत. भांडवलाची कमतरता असलेल्या महिलांना आता भरघोस अनुदान आणि कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर खालील तीन योजना अत्यंत प्रभावी आणि फायदेशीर ठरू शकतात:

1. मुद्रा योजना (महिलांसाठी विशेष सवलत)

‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ (PMMY) अंतर्गत महिला उद्योजिकांना प्राधान्य दिले जाते. लघु उद्योग सुरू करण्यासाठी हे सर्वात सोपे कर्ज मानले जाते.

कर्जाचे प्रकार: यामध्ये ‘शिशू’ (५०,००० रुपयांपर्यंत), ‘किशोर’ (५ लाख रुपयांपर्यंत) आणि ‘तरुण’ (१० लाख रुपयांपर्यंत) असे तीन टप्पे आहेत.

वैशिष्ट्ये: या कर्जासाठी कोणत्याही तारणाची (Collateral) गरज नसते. महिलांना व्याजाच्या दरात सवलत मिळते आणि प्रक्रिया शुल्कही (Processing Fee) माफ केले जाते.

उपयोग: टेलरिंग, बुटीक, ब्युटी पार्लर किंवा घरगुती खाद्यपदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी हे कर्ज उपयुक्त आहे.

कर्जाचे व्याजदर बँकेनुसार वेगवेगळे असतात. तथापि, ते आरबीआयच्या नियमांनुसार निश्चित केले जातात. तुम्ही www.mudra.org.in वर ऑनलाइन अर्ज करू शकता. पीएमएमवायच्या माध्यमातून महिलांना जलद निधी मिळतो आणि त्या आपली कौशल्ये सुधारू शकतात, ज्यामुळे व्यवसायाची जलद वाढ होते.

पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट; सर्वपक्षीय बैठक आज होणार

2. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम

देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारची ‘पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (PMEGP) ही योजना अत्यंत प्रभावी ठरत आहे. नवीन लघु उद्योग किंवा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी या योजनेद्वारे मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत आणि अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.

योजनेचे स्वरूप आणि आर्थिक मर्यादा:

या योजनेअंतर्गत प्रामुख्याने दोन क्षेत्रांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते:
उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्र: नवीन प्रकल्प उभारण्यासाठी ५० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते.
सेवा किंवा व्यापार क्षेत्र: सेवा क्षेत्रातील व्यवसायांसाठी २० लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

अनुदानाचे (Subsidy) गणित:

या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मिळणारे भरघोस अनुदान. महिलांसाठी अनुदानाचे दर खालीलप्रमाणे आहेत:
ग्रामीण भाग: प्रकल्प खर्चाच्या २५% ते ३५% पर्यंत अनुदान दिले जाते.
शहरी भाग: प्रकल्प खर्चाच्या १५% ते २५% पर्यंत अनुदान उपलब्ध आहे.

पात्रता आणि अटी:

१. अर्जदार महिलेचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
२. स्वयं-सहायता गट (SHG), नोंदणीकृत संस्था किंवा सहकारी संस्थांचे सदस्यही या योजनेसाठी पात्र आहेत.
३. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘PMEGP’ च्या अधिकृत ई-पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतो.

Weather Update : देशातील अनेक राज्यांत वातावरणात कमालीचा बदल; काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

3. लखपती दीदी योजना

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारची ‘लखपती दीदी’ योजना अत्यंत कळीची ठरत आहे. स्वयं-सहायता गटांशी (SHGs) जोडल्या गेलेल्या महिलांचे वार्षिक उत्पन्न किमान १ लाख रुपयांपर्यंत नेणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

योजनेचे प्रमुख फायदे आणि तरतुदी:

मोठ्या कर्जाची सुविधा: महिलांना स्वतःचा लघु उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये व्याजात विशेष सवलतही दिली जाते.

विविध क्षेत्रांत कौशल्य प्रशिक्षण: केवळ आर्थिक मदतच नाही, तर कृषी, हस्तकला, बँकिंग आणि पर्यटन यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये महिलांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. यामुळे महिलांना नवीन कौशल्ये आत्मसात करून आपली कमाई वाढवता येते.

आत्मनिर्भरतेवर भर: महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि कोणावरही विसंबून न राहता आत्मनिर्भर बनावे, हा या योजनेचा मूळ हेतू आहे.

पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

१. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला स्वयं-सहायता गटाची (SHG) सदस्य असणे अनिवार्य आहे.
२. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना यामध्ये प्राधान्य दिले जाते.

या योजनेमुळे ग्रामीण महिलांच्या जीवनशैलीत मोठी सुधारणा होत असून, लक्षावधी महिला आज ‘लखपती दीदी’ बनून सन्मानाने जीवन जगत आहेत.

महिला उद्योजकांसाठी काही महत्त्वाचे फायदे:

कमी व्याजदर: अनेक सरकारी बँका महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी व्याजदराने कर्ज देतात.

स्टॅम्प ड्युटी सवलत: मालमत्ता खरेदी किंवा भाडेकरारावर मुद्रांक शुल्कात (Stamp Duty) विशेष सूट मिळते.

प्रशिक्षण सुविधा: MSME मंत्रालयाकडून महिलांना उद्योग कसा चालवावा, याचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाते.

पात्रता:

अर्जदार महिला भारताची नागरिक असावी.

वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.

आधार कार्ड, पॅन कार्ड आणि व्यवसायाचा आराखडा (Project Report) असणे आवश्यक आहे.

 

Web Title: These 3 government schemes will provide assistance ranging from 10 lakhs to 50 lakhs to women entrepreneurs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • central goverment
  • Central government
  • Lakhpati Didi Scheme

संबंधित बातम्या

ऑनलाइन सट्टेबाजीचा खेळ खल्लास! केंद्र सरकारची मोठी कारवाई; 300 हून अधिक बेकायदेशीर जुगार आणि बेटिंग अ‍ॅप्सवर बंदी
1

ऑनलाइन सट्टेबाजीचा खेळ खल्लास! केंद्र सरकारची मोठी कारवाई; 300 हून अधिक बेकायदेशीर जुगार आणि बेटिंग अ‍ॅप्सवर बंदी

India’s Industrial Revolution: भारत औद्योगिक विकास योजना’ (भविष्य) मंजूर; ३३,६६० कोटींची मोठी तरतूद
2

India’s Industrial Revolution: भारत औद्योगिक विकास योजना’ (भविष्य) मंजूर; ३३,६६० कोटींची मोठी तरतूद

हॉटेल, रेस्टॉरंट्स, व्यावसायिकांना दिलासा; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
3

हॉटेल, रेस्टॉरंट्स, व्यावसायिकांना दिलासा; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.