
तिरुपतीमध्ये मुंडन करण्याचा नवा विक्रम; १२.४ लाख भाविकांनी केस केले अर्पण, आतापर्यंतची सर्वात विक्रमी आकडेवारी
Tamilnadu Politics: निवडणुकीनंतर भाजपला पहिला झटका! अण्णामलाईंचा अखेरचा रामराम
१६७ कोटी रुपयांची उलाढाल
धार्मिक महत्वाबरोबरच, हे केस टीटीडीसाठी महसुलाचा एक प्रमुख स्रोत बनले आहेत. याला ‘काळे सोने’ म्हटले जाते. निवड आणि प्रतवारी केल्यानंतर, गोळा केलेल्या केसांचा चीन, इटली, अमेरिका आणि ब्राझीलसारख्या देशामध्ये लिलाव केला जातो, जिथे त्यांचा वापर विग, हेअर एक्सटेंशन आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो. आकडेवारीनुसार, केसांच्या लिलावातून २०२०-२१ मध्ये ६७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला, जो २०२३-२४ मध्ये वाढून १६७ कोटी रुपये झाला, २०२४-२५ मध्ये हा आकडा १९० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे आणि पुढील आर्थिक वर्षात तो २०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडेल अशी अपेक्षा आहे.
न्हावी शिफ्टमध्ये करत आहेत काम
टीटीडीने मुख्य कल्याणकट्टा आणि तिरुमला येथे पसरलेल्या ११ लहान मुंडन केंद्रांमार्फत चोवीस तास मुंडन सेवा सुरू ठेवली आहे. अखंड सेवा आणि कमीत कमी प्रतीक्षा वेळ सुनिश्चित करण्यासाठी, २६९ महिला न्हाव्यांसह १,१५० हून अधिक न्हावी शिफ्टमध्ये काम करत आहेत. धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त, मानवी केस टीटीडीसाठी देणगीव्यतिरिक्त मिळणाऱ्या महसुलाचा एक प्रमुख सीत म्हणून उदयास आले आहेत. भक्तांकडून गोळा केलेले केस काळजीपूर्वक निवडले जातात, त्यांची प्रतवारी केली जाते आणि नंतर चीन, इटली, अमेरिका आणि ब्राझीलसारख्या देशांतील खरेदीदारांना त्यांचा लिलाव केला जातो.