Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ishan Kishan: एका खेळीत विश्वविक्रम! ईशान किशनचा मैदानात धुमाकूळ; सूर्यकुमार यादवचा ‘हा’ रेकॉर्ड मोडत T20I मध्ये रचला इतिहास

Ishan Kishan Breaks Suryakumar Yadav Most Boundaries Record: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेचा निर्णायक सामना पावसामुळे रद्द झाला असला तरी, ईशान किशनने या सामन्यात सूर्यकुमार यादवचा मोठा विक्रम मोडला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 18, 2026 | 03:19 PM
Ishan Kishan Breaks Most Boundaries Record

Ishan Kishan Breaks Most Boundaries Record

Follow Us
Follow Us:
  • ईशान किशनचा चौकार-षटकारांचा पाऊस
  • सूर्यकुमार यादवचा विक्रम इतिहासजमा
  • चौकार-षटकारांनी गाजवलं मैदान
Ishan Kishan: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका २-२ ने ड्रॉ झाली. बंगळूरु येथे खेळला गेलेला मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मात्र, टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर-फलंदाज ईशान किशनने या सामन्यात आपल्या बॅटने धुमाकूळ घातला. ईशानने अवघ्या १० चेंडूंमध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांसह ३० धावांची धडाकेबाज खेळी केली.त्याच्या खेळीमुळे भारताने अवघ्या ७.४ षटकांत ५ विकेट्स गमावून ११८ धावा केल्या. मात्र, पुन्हा पावसामुळे व्यत्यय आल्याने सामना रद्द करण्यात आला. या खेळीदरम्यान, ईशानने भारताचा माजी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम मोडला. (Ishan Kishan Breaks Suryakumar Yadav Most Boundaries Record)

IND vs WI T20: बंगळुरूत पावसाचा खेळ! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द, मालिका विजयाचं स्वप्न अधुरंच

ईशान किशनने सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

ईशान किशनने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक चौकार मारणारा खेळाडू बनण्याचा मान मिळवला आहे. त्याने सूर्यकुमार यादवचा हा विक्रम मोडून आपल्या नावावर केला. २०२६ मध्ये आतापर्यंत ईशानने १२२ चौकार आणि ५५ षटकारांसह एकूण १७७ चौकार मारले आहेत. यावर्षी ईशानने ३४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १,१५८ धावा केल्या आहेत.

दरम्यान, भारताचा माजी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने २०२२ मध्ये एकूण १७४ चौकार मारले, ज्यात १०६ चौकार आणि ६८ षटकारांचा समावेश होता. त्या वर्षी सूर्याने भारतासाठी ३१ टी-२० सामन्यांमध्ये १,१६४ धावा केल्या होत्या. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अभिषेक शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. अभिषेकने यावर्षी ३४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९५६ धावा केल्या असून, त्यात ९२ चौकार आणि ७० षटकारांसह एकूण १६२ चौकारांचा समावेश आहे.

टी२०मध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक चौकार मारणारे खेळाडू

  • ईशान किशन – १७७, २०२६
  • सूर्यकुमार यादव- १७४, २०२२
  • अभिषेक शर्मा- १६२, २०२६
  • मोहम्मद रिझवान – १६१- २०२१
  • अभिषेक शर्मा – १३९, २०२५
  • ब्रायन बेनेट- १३५, २०२५
  • बाबर आझम- ११६, २०२१
  • संजू सॅमसन – ११०, २०२६
  • पॉल स्टर्लिंग – ११०, २०१९
  • सूर्यकुमार यादव- १०४, २०२३

ईशान किशनने रोमॅरिओ शेफर्डला धुतले

बंगळूरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या पाचव्या टी२० सामन्यात, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताने आक्रमक सुरुवात केली, पण सलामीवीर अभिषेक शर्मा एका मोठ्या षटकारावर बाद झाला. त्यानंतर ईशानने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई केली.

ईशानने वादळी फलंदाजी करत १० चेंडूंमध्ये ३ चौकार आणि २ षटकार ठोकत ३० धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट ३०० होता. या खेळीदरम्यान, ईशानने रोमारिओ शेफर्डच्या केवळ एका षटकात २३ धावा केल्या. त्याने या षटकात २ चौकार आणि २ षटकार मारले. कर्णधार श्रेयस अय्यरने १४ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या, तर नमन धीरने ६ चेंडूंमध्ये १ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद २४ धावा केल्या. या ९ षटकांच्या सामन्यात भारताने ७.४ षटकांत ५ विकेट्स गमावून ११८ धावा केल्या होत्या.

IND vs WI 5th T20 Live: बंगळुरूत पावसाची बॅटिंग! टॉसला विलंब, टीम इंडियासमोर प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान

Web Title: Ishan kishan breaks suryakumar yadav most boundaries record t20i in calendar year pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Ishan Kishan
  • Record
  • Suryakumar Yadav
  • T20 cricket

संबंधित बातम्या

सूर्यकुमार यादवचा विक्रम आता इतिहासजमा! T20I मध्ये Abhishek Sharma बनला नवा ‘सिक्सर किंग’
1

सूर्यकुमार यादवचा विक्रम आता इतिहासजमा! T20I मध्ये Abhishek Sharma बनला नवा ‘सिक्सर किंग’

RATNAGIRI : १६ महिन्यांच्या आयरिशचा जलतरणात विक्रम; १०० मीटर अंतर १६ मिनिटांत केले पूर्ण
2

RATNAGIRI : १६ महिन्यांच्या आयरिशचा जलतरणात विक्रम; १०० मीटर अंतर १६ मिनिटांत केले पूर्ण

ICC T-20 Ranking : सरपंचने करून दाखवलं! शतकीय खेळीमुळं श्रेयसला मोठं बक्षिस, तर टी-20 मध्ये ईशान किशनची ‘बादशाही’ कायम
3

ICC T-20 Ranking : सरपंचने करून दाखवलं! शतकीय खेळीमुळं श्रेयसला मोठं बक्षिस, तर टी-20 मध्ये ईशान किशनची ‘बादशाही’ कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.