Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिरूपतीच्या लाडूत प्राण्यांची चरबीच्या रिपोर्टवर RSSचा संताप; अयोध्येलाही पाठवण्यात आले होते लाडू

टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी दावा केला आहे की, प्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) ने पुरवलेल्या तुपाचे नमुने गुजरात स्थित पशुधन प्रयोगशाळेने भेसळ असल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी प्रयोगशाळेत कलेल्या तपासणीचा अहवालही दाखवला आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 20, 2024 | 08:49 AM
तिरूपतीच्या लाडूत प्राण्यांची चरबीच्या रिपोर्टवर RSSचा संताप; अयोध्येलाही पाठवण्यात आले होते लाडू
Follow Us
Close
Follow Us:

आंध्र प्रदेश : तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीच्या तेलाचा वापर केल्याचे उघडकीस आल्यापासून राजकारण चांगलेच तापले आहे. आता यासंदर्भात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यने तिरुपती मंदिरातील लाडूंसंदर्भात मोठे विधान करत अक्षरश: संताप व्यक्त केला आहे.  तिरुपती तिरुमला मंदिरातून 1 लाख लाडू अयोध्येला पाठवण्यात आल्याचा दावा मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात करण्यात आला आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाच्या दिवशी तिरुपती मंदिरातून १ लाख लाडू पाठवण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. अयोध्येतील भाविकांमध्ये हे लाडू वाटण्यात आले. तिरुपती मंदिराच्या प्रसादात गोमांस, डुकराची चरबी आणि माशाचे तेल मिसळल्याचेही तपासात समोर आले आहे. हे सर्व आंध्र प्रदेशातील तत्कालीन जगनमोहन रेड्डी सरकारच्या कार्यकाळात घडले.

हेही वाचा:  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; अनेक योजनांचा करणार शुभारंभ

प्रयोगशाळेचा तपसणी अहवाल

टीडीपीचे प्रवक्ते अनम वेंकट रमण रेड्डी यांनी दावा केला आहे की, प्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) ने पुरवलेल्या तुपाचे नमुने गुजरात स्थित पशुधन प्रयोगशाळेने भेसळ असल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी प्रयोगशाळेत कलेल्या तपासणीचा अहवालही दाखवला आहे. या अहवालानुसार,  तपासणीसाठी देण्यात आलेल्या तुपाच्या नमुन्यात “प्राण्यांची चरबी”, “लार्ड” (डुकराच्या चरबीशी संबंधित) आणि फिश ऑइलच असल्याचा दावा करण्यात आला होता. सॅम्पलिंगची तारीख 9 जुलै 2024 होती आणि प्रयोगशाळेचा अहवाल 16 जुलैचा होता.

आंध्र प्रदेश सरकारकडून मंदिराचे व्यवस्थापन

तथापि, प्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या आंध्र प्रदेश सरकार किंवा तिरुमाला तिरुपती देवस्थानने (TTD) यांच्या प्रयोगशाळेच्या अहवालावर अधिकृत पुष्टी केलेली नाही. नायडूंच्या आरोपांमुळे देवतेच्या पवित्र स्वरूपाचे नुकसान झाले आहे आणि भक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप वायएसआरसीपीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांनी केला आहे.

हेही वाचा: ऐन विधानसभा निवडणुकीआधी राज्यात ‘या’ तिसऱ्या आघाडीची घोषणा

Web Title: Tirupati laddu controversy udate news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 08:49 AM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • RSS
  • Tirupati Laddu Controversy

संबंधित बातम्या

मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर प्रशासनाने सांगितले…
1

मंदिराच्या प्रसादात आढळली गोगलगाय! Video व्हायरल झाल्यानंतर भाविकांचा संताप; तर मंदिर प्रशासनाने सांगितले…

Mohan Bhagwat: “हिंदू जर योग्य मार्गावर चालले तर…”, बांगलादेशच्या परिस्थितीवर मोहन भागवतांचे मोठे विधान
2

Mohan Bhagwat: “हिंदू जर योग्य मार्गावर चालले तर…”, बांगलादेशच्या परिस्थितीवर मोहन भागवतांचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.