
Union Home Minister Amit Shah comments on Sanatan Hinduism during Rishikesh visit
ऋषिकेश येथील कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी एक जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मुघल राजवटीत हिंदू धार्मिक स्थळांवरील झालेला अत्याचारांचा आणि तोडफोड याचा उल्लेख केला. तसेच यानंतर देखील सनातन धर्म आजही कायम असल्याचे देखील अमित शाह म्हणाले आहेत. ते म्हणाले, “गझनवी, खिलजी आणि मोहम्मद बेगडा, ज्यांनी मंदिरांना उद्ध्वस्त केले ते सर्व गायब झाले आहेत. मात्र आजही सोमनाथ येथे सनातन धर्माचा ध्वज अजूनही फडकत आहे.” असे अमित शाह म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : निवडणूक रोख्यांवर बंदीनंतरही भाजपच्या देणग्यांमध्ये कोट्यवधींची वाढ; आकडा वाचून बसेल धक्का
पुढे ते म्हणाले की, “औरंगजेबने काशी विश्वनाथ कॉरिडॉर उद्ध्वस्त केला. ज्यांनी तो उद्ध्वस्त केला त्यांच्यापेक्षा श्रद्धेची शक्ती खूप मोठी आहे. आपले पवित्र स्थान १६ वेळा उद्ध्वस्त झाले आणि १६ वेळा पुन्हा बांधले गेले. ज्यांनी ते उद्ध्वस्त केले – गझनवी, खिलजी आणि मोहम्मद बेगडा – ते सर्व गायब झाले, परंतु सोमनाथवर सनातन धर्माचा ध्वज अजूनही उंच फडकत आहे. सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त होऊन एक हजार वर्षे झाली आहेत. भारत सरकार संपूर्ण वर्ष सोमनाथ आत्मसन्मान वर्ष म्हणून साजरे करणार आहे, असे देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : “दीदींना पश्चिम बंगालचं ‘पश्चिम बांगलादेश’ करायचंय…”, मिथुन चक्रवर्तींचा ममता बॅनर्जींवर घणाघात
त्याचबरोबर अमित शाह यांनी रामजन्मभूमि असलेल्या अयोध्येतील मंदिराचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले की, “साडेपाचशे वर्षांनंतर, रामलाल यांना अपमानास्पद परिस्थितीतून वाचवण्यात आले आहे आणि आज तिथे एक गगनाला भिडणारे मंदिर स्थापन झाले आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आले. महाकालेश्वर कॉरिडॉर बांधण्यात आला. केदारनाथ मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. ब्रिटिश काळापासून, आपल्या पवित्र ठिकाणांवरील मूर्ती जगभरातून नेण्यात आल्या. ६४२ हून अधिक मूर्ती परत आणण्यात आल्या आणि पुन्हा स्थापित करण्यात आल्या.”अशी माहिती अमित शाह यांनी दिली आहे.