Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : वर्धापनदिनी मनसे पक्ष रायगडावरुन फुंकणार रणशिंग; राज ठाकरेंची सोशल मीडिया पोस्टमधून खास रणनीती

Political News : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्या (दि.09) मनसे पक्षाचा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने पक्षासाठी सभासद नोंदणी केली जाणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 08, 2026 | 04:24 PM
Raj Thackeray social media post on MNS foundation day member registration

Raj Thackeray social media post on MNS foundation day member registration

Follow Us
Close
Follow Us:
  • मनसे पक्षाचा वर्धापन दिन
  • राज ठाकरे यांची खास सोशल मीडिया पोस्ट
  • राज ठाकरे करणार सभासद नोंदणीला सुरुवात
Raj Thackeray Post : मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला मोठा धक्का बसला. ठाकरे बंधूंसोबत युती करुन देखील मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवता आलेली नाही. यानंतर आता पक्षाला नवीन उभारी देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्या (दि.09) मनसे (MNS Politics) पक्षाचा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने पक्षासाठी सभासद नोंदणी केली जाणार आहे. याची सुरुवात स्वतः राज ठाकरे (Raj Thackeray) करणार असून यासाठी ते रायगडावर दाखल होणार आहेत.

 

राज ठाकरे यांनी सोशल मिडिया पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी पक्षाची आगामी रणनीती ठरवण्यासाठी सदस्य नोंदणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, “आपल्या पक्षाचा उद्या, ९ मार्च २०२६ ला २० वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरु होत आहे. उद्या ९ मार्च ला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहे. या रायगडाने महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच पण ‘शिवराज्याभिषेकाचा’ साक्षीदार देखील हा किल्लाच. अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरु करत आहोत,” अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आहे.

हे देखील वाचा : घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ अन् व्यावसायिक गॅसचा तुटवडा: CM देवेंद्र फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया

पुढे त्यांनी लिहिले आहे की, “आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही हे मुळात लक्षात घ्या. तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना आपल्याला, आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचं आहे. तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या.”

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र,
आपल्या पक्षाचा उद्या, ९ मार्च २०२६ ला २० वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरु होत… — Raj Thackeray (@RajThackeray) March 8, 2026


“सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात पण करणार आहोत ज्याचा तपशील तुम्हाला १० मार्चला कळलेच, फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी माझे महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत , उदा . मार्केट, शाळा , मंदिरं , कॅालेज , मैदानं , बागा वगैरे अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी आपली सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत ! येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आपलंस करत ही सभासद नोंदणी करा. यासाठी तुम्हाला जी मदत लागेल ती आपले सर्व पदाधिकारी तसेच शहर अध्यक्ष, उप शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष , सरचिटणीस आणि पक्षाच्या नेत्यांना कळवा ! तसे आदेश मी त्यांना दिले आहेत !” अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आहे.

हे देखील वाचा : “राजकारण शेकण्यासाठी व्हल्गर विधानं”; गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना धरलं धारेवर

“प्रश्न आकड्याचा नाहीये, तशीही आपली सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे हे देखील स्पष्ट होईल ! त्यामुळे जोरदार सदस्य नोंदणी होईल यासाठी पूर्ण कसोशीने प्रयत्न करा. तुम्हाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा. बाकी १९ मार्चला गुढी पाडव्याला शिवतीर्थावर आपली भेट होईलच , आणि तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून याल त्यामुळे मला तुमच्या रूपात महाराष्ट्र दर्शन देखील घडेलंच ! तःची तसेच आपल्या परिवाराची आणि महाराष्ट्राची काळजी घ्या !’ असे मनसे नेते राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे.

Web Title: Raj thackeray social media post on mns foundation day member registration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • MNS Politics
  • political news
  • Raj Thackreay

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : “राजकारण शेकण्यासाठी व्हल्गर विधानं”; गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना धरलं धारेवर
1

Maharashtra Politics : “राजकारण शेकण्यासाठी व्हल्गर विधानं”; गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना धरलं धारेवर

Nepal Election : नेपाळमध्ये सत्तापालट ! बालेन शाह होणार नवे पंतप्रधान; ओली यांचा दारूण पराभव
2

Nepal Election : नेपाळमध्ये सत्तापालट ! बालेन शाह होणार नवे पंतप्रधान; ओली यांचा दारूण पराभव

Dharashiv News: धाराशिव पंचायत समितीवर भाजपचा झेंडा! सभापतीपदी गोकर्णा कदम तर उपसभापतीपदी प्रमोद पाटील यांची निवड
3

Dharashiv News: धाराशिव पंचायत समितीवर भाजपचा झेंडा! सभापतीपदी गोकर्णा कदम तर उपसभापतीपदी प्रमोद पाटील यांची निवड

Bihar Politics : बिहारच्या राजकारणातील नीतीश कुमार पर्व समाप्त! मंत्रिमंडळाची संभाव्य यादी आली समोर
4

Bihar Politics : बिहारच्या राजकारणातील नीतीश कुमार पर्व समाप्त! मंत्रिमंडळाची संभाव्य यादी आली समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.