Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Barabanki Mandir Stampede : बाराबंकी मंदिरात दर्शनरांगेत विजेचा शॉक; भाविकांची चेंगराचेंगरी, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Barabanki Mandir Stampede : उत्तर प्रदेशमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. दर्शनरांगेमध्ये विजेचा शॉक लागल्याने भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 28, 2025 | 11:02 AM
UP Barabanki temple stampede due to electric shock darshan two dead 40 injured

UP Barabanki temple stampede due to electric shock darshan two dead 40 injured

Follow Us
Close
Follow Us:

Barabanki Mandir Stampede : उत्तर प्रदेश : आज (दि.28) श्रावणातील पहिला सोमवार आहे. यामुळे मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे.  उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील मनसा देवी मंदिरात देखील काल चेंगराचेंगरीची घटना घडली होती. यामध्ये अनेक भाविकांनी जीव गमावल्यानंतर आता आज देखील मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात श्रावण महिन्याच्या सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. तर, ४० हून अधिक लोक जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

श्रावणी सोमवारनिमित्ताने शंकराच्या आणि इतर सर्वच मंदिरांमध्ये मोठी गर्दी जमा झाली आहे. श्रावणातील दर्शनासाठी मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी आले आहेत. या दरम्यान एक मोठा अपघात झाला. खरंतर, विजेचा तार तुटला आणि भाविकांच्या रांगेत पडला. यामुळे टीन शेडमध्ये विद्युत प्रवाह वाहू लागला. विजेचा धक्का बसल्याने चेंगराचेंगरीची घटना झाली आहे. या चेंगराचेंगरीत दोघांचा मृत्यू झाला आहे, तर ४० हून अधिक शिवभक्त जखमी झाले आहेत. त्यांना ताबडतोब बाराबंकी जिल्ह्यातील त्रिवेदीगंज सीएचसीमध्ये आणण्यात आले, त्यापैकी दोन भाविकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

चेंगराचेंगरीवर बाराबंकी डीएम काय म्हणाले?

मंदिरामध्ये दुर्घटना झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पूर्ण प्रयत्न प्रशासन आणि पोलीस अधिकारी करत आहेत. घटनेची माहिती देताना डीएम म्हणाले की, माकडांनी तोडलेल्या जुन्या विजेच्या तारेमुळे टिन शेडमध्ये भेगा पडल्या आणि भाविक त्यात अडकले. जिल्हा दंडाधिकारी शशांक त्रिपाठी यांच्या मते, जखमींना उपचारासाठी सीएचसी हैदरगड आणि त्रिवेदीगंज येथे पाठवण्यात आले आहे.

बाराबंकी येथील एका व्यक्तीचा हरिद्वारमध्ये मृत्यू

काल म्हणजेच रविवारी हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत बाराबंकी येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले आहेत. या घटनेत ठार झालेल्या व्यक्तीचे नाव वकील प्रसाद वर्मा असे आहे, तो बाराबंकीतील मौलाबाद येथील रहिवासी आहे. जखमींमध्ये धुरमाळ गावातील दुर्गावती, राधिका आणि फुलमती यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मनसा देवी मंदिरात ८ जणांचा मृत्यू

गेल्या रविवारी हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात विजेचा धक्का बसल्याच्या अफवेमुळे चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये ८ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी, अनेक लोक गंभीर जखमी झाले. सावननिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी जमली होती. दरम्यान, विजेचा धक्का बसल्याची अफवा पसरली आणि त्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी लोक एकमेकांवर चढू लागले.

Web Title: Up barabanki temple stampede due to electric shock darshan two dead 40 injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 11:02 AM

Topics:  

  • Shravan 2025
  • UP Crime News
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

UP BJP Politics : उत्तर प्रदेशमध्ये राजकीय हालचालींना वेग; 14 डिसेंबरपर्यंत ठरणार भाजप अध्यक्ष
1

UP BJP Politics : उत्तर प्रदेशमध्ये राजकीय हालचालींना वेग; 14 डिसेंबरपर्यंत ठरणार भाजप अध्यक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.