तिसऱ्या रिंगरोडसाठी मुहूर्त! एनएमआरडीचा प्रोजेक्ट 6 तालुक्यातील 36 गावांना जोडणार
नागपूर ग्लोबल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे प्रयत्न सुरू आहेत. शहराला लागून दुसऱ्या रिंगरोडचे काम पूर्ण झाले असून आता तिसऱ्या रिंगसाठी जागा आरक्षित करण्यात येत आहे. यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाचे (एनएमआरडीए) आयुक्त संजय मीना यांनी सूचना प्रसिद्ध केली आहे. तिसरा रिंग रोड जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण, सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी, मौदा व कामठी तालुक्यातील 36 गावांतून जाणार असून 880 हेक्टर आर जागा आरक्षित करण्यात येणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला असून येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. किंबहुना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातूनच विस्तार होत असल्याने मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी ग्राह्य धरली जात आहे.
Nagpur News : नागपूर – नागभीड ब्रॉड गेज मार्ग कधी पूर्ण होणार? प्रताप सरनाईक यांनी सांगितली डेडलाईन
उपराजधानीचा विस्तार झपाट्याने होत आहे. नागपूर देशाच्या मध्यभागी असल्याने येथून मोठ्या प्रमाणात जड वाहतुकीची भर पडली आहे. नागपुरातील रिंग रोड आता भर वस्तीत असल्याचे चित्र आहे. यावरून वाहतूक कमी करण्यासाठी आऊटर रिंग रोड तयार करण्यात आला आहे. शहरात दररोज 400 पेक्षा जास्त वाहनांची नोंद होत असल्याने या वाहनांसाठीच रस्ते कमी पडणार आहे. त्यामुळे बाहेरची जड वाहनांची गर्दी शहर सोसणार नाही. दुसरा आऊटर रिंग रोड पूर्ण झाला असून यावरही जड वाहनांची वर्दळ वाढत आहे. भविष्यात हा आऊटर रिंग रोडही कमी पडण्याची शक्यतानाकारता येत नाही. याशिवाय आता नागपूर शहराच्या सिमाही कामठी, कळमेश्वर, हिंगणा तालुक्यापर्यंत पोहोचली आहे. हिंगणा तालुक्यात तर नवीन नागपूरचाप्रस्तावाचे गॅझेट नोटीफिकेशनही निघाले. शहर व जिल्ह्याची भविष्यातील गरज ओळखून नवीन तिसरा रिंग रोडचे नियोजन करण्यात आले आहे.
समृद्धीसह सर्वच प्रमुख मार्गावर जाण्यासाठी उत्तम पर्याय
नवीन तिसरा रिंग रोड जिल्ह्याच्या भोवताल असलेल्या सर्वच राष्ट्रीय, राज्य महामार्गावर जाण्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. नागपूर शहराचा दक्षिण भाग अर्थात अमरावती राष्ट्रीय महामार्ग, हिंगणा राज्यमार्ग, 1. समृद्धी महामार्ग, हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग, उमरेड राष्ट्रीय महामार्ग, भंडारा राष्ट्रीय महामार्ग, जबलपूर राष्ट्रीय महामार्गाला ओलांडून नवीन तिसरा रिंग रोड तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गासह सर्वच प्रमुख मार्गावर जड वाहतुकीसाठी हा रिंग रोड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याशिवाय या महामार्गाला 36 खेड्यांचे रस्ते थेट जुडणार आहे. त्यामुळे गाववासींचा प्रवासही सुकर होणार आहे.
पारशिवनी तालुक्यातील इटगाव येथे ट्रान्सपोर्ट प्लाझा
या तिसऱ्या आऊटर रिंग रोडवर ट्रांसपोर्ट प्लाझाही प्रस्तावित करण्यात आला आहे. पारशिवनी तालुक्यातील इटगाव येथे ट्रान्सपोर्ट प्लाझा तयार करण्यात येणार आहे. यासाठी 9.35 हेक्टर आर जागा आरक्षित करण्यात येणार आहे. याबाबतही अधिसूचनेत समावेश असून ही अधिसूचना एनएमआरडीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. प्रस्तावित तिसऱ्या रिंग रोडचा आराखडाही एनएमआरडीएच्या कार्यालयात निरीक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. यावर येणाऱ्या सूचना व हरकतींवर एनएमआरडीएकडून सुनावणी घेण्यात येईल, असे एनएमआरडीएचे आयुक्त संजय मीना यांनी स्पष्ट केले आहे.
वीज दर कमी नव्हे तर आणखी वाढणार, कंपन्यांकडून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल; उद्योग संघटनांचा दावा
कुठून जाणार नवीन रिंगरोड ?
नवीन तिसरा रिंग रोड 6 तालुक्यातून जाणार आहे. यात नागपूर ग्रामीणमधील मोहगाव (खुर्द), भुयारी, कळमेश्वर तालुक्यातील बोरगाव (खुर्द), बेलोरी, सावनेर तालुक्यातील सिल्लोरी, इटनगोटी, बेलोरी (खुर्द), पाटणसावंगी, कवडस, इसापूर, वलनी, कामठी तालुक्यातील तांडुळवाणी, उदगाव, भोवरी, पारशिवनी तालुक्यातील पारडी -9. इटगाव, तामसवाडी, गुंडरी (वाढे), सोनेगाव, गंरडा, वाघोडा, घाट रोहना, एसांबा, वराडा, चांपा, टेकाडी (गोडेगाव), बोरडा (गणेशी), बोरी (राणी) 16, खेडी, बोरी सिंगोरी, सिंगारदीप, निलज, मौदा तालुक्यातील खोपडी, सालवा या गावांतून हा नवीन तिसरा रिंग रोड जाणार असून जमिन आरक्षित करण्यात येणार आहे.