Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Owaisi on Gadkari : ‘मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,’ ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक

Owaisi on Gadkari : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नितीन गडकरींचे जाहीरपणे आभार मानत पाच आमदारांशी झालेल्या भेटीचा किस्सा सांगितला. याचवेळी उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: Sep 21, 2026 | 03:39 PM
ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक

ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा; भाजपवर टीका पण गडकरींचं कौतुक

Follow Us
Follow Us:
  • एमआयएमच्या पाच आमदारांना गडकरींनी तब्बल 45 मिनिटे वेळ दिल्याचा ओवैसींचा दावा
  • पुलं आणि अंडरपासच्या प्रश्नावर गडकरींनी दिल्या अधिकाऱ्यांना काम सुरू करण्याच्या सूचना
  • उत्तर प्रदेशातील आगामी निवडणूक वेगळी आणि आव्हानात्मक – ओवैसी
 

Owaisi on Gadkari : देशातील राजकीय घडामोडीना सध्या वेग प्राप्त झाला असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोजच टीका – टिपण्ण्या, आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अश्यातच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक आणि आभार जाहीरपणे त्याचे कट्टर विरोधक मानले जाणारे एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मानले आहेत.

रविवारी (20 सप्टेंबर) ओवैसी कानपूरमध्ये होते. यावेळी त्यांनी बिहारमध्ये निवडून आलेल्या आपल्या पाच आमदारांची गडकरींसोबत झालेली भेट आणि त्यानंतर घडलेला किस्सा सांगितला. ओवैसींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले ओवैसी ?

ओवैसी म्हणाले की, “बिहारमध्ये एमआयएमचे पाच आमदार निवडून आल्यानंतर त्यांनी नितीन गडकरींची भेट घेतली. या भेटीत गडकरींनी आमदारांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. तब्बल 45 मिनिटे त्यांनी वेळ दिला. या भेटीत जुन्या पुलांचा प्रश्न, अंडरपास आणि इतर पायाभूत सुविधांबाबत आमदारांनी गडकरींना माहिती दिली. त्यानंतर आपण गडकरींना, सर, तुम्ही फोन करून काम सुरू करायला सांगा,” अशी विनंती केली. त्यावर गडकरींनी तात्काळ फोन केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना काम लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या,” असं ओवैसी म्हणाले.

राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? भरत गोगावले यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; CM होण्यासाठी त्यांनी…

“मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत,” असं गडकरींनी अधिकाऱ्यांना सांगितल्याचा किस्साही ओवैसींनी यावेळी सांगितला. त्यामुळे ओवैसींनी गडकरींचे जाहीर आभार मानले.

‘ही निवडणूक 2014, 2017, 2019 किंवा 2022 सारखी नाही’

यानंतर ओवैसींनी थेट उत्तर प्रदेशच्या राजकारणावर निशाणा साधला. आगामी विधानसभा निवडणूक आधीच्या निवडणुकांसारखी राहणार नाही, असा दावा त्यांनी केला. 2014, 2017, 2019 आणि 2022 पेक्षा यावेळची निवडणूक वेगळी आणि आव्हानात्मक असेल, असं ते म्हणाले.

भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. समाजवादी पार्टीच्या काळात यादव राजकारणाची चर्चा होत होती, तर आता ठाकूर वर्चस्वाची चर्चा होत असल्याचं ओवैसी म्हणाले.

गरीबांच्या जमिनींच्या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल

उत्तर प्रदेशातील विकास, वीज आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरूनही ओवैसींनी सरकारला घेरलं. भाजपच्या सत्ताकाळात गरीबांच्या जमिनी बळकावल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला. “पूर्वी समाजवादी पार्टीच्या सरकारमध्ये वेगळ्या पद्धतीची गुंडगिरी होती, आता योगी सरकारमध्ये वेगळ्या प्रकारची गुंडगिरी आहे,” असा आरोप ओवैसींनी केला.

राम मंदिराशी संबंधित कथित हेराफेरीच्या एसआयटी रिपोर्टचाही त्यांनी मुद्दा उपस्थित केला. हा रिपोर्ट सरकार जाहीर का करत नाही, असा सवाल त्यांनी केला. संबंधित प्रकरणांतील आरोपींना जामीन कसा मिळतो, हाही आगामी निवडणुकीतील चर्चेचा मुद्दा असेल, असं ओवैसी म्हणाले.

दरम्यान, ओवैसींनी गडकरींचे जाहीर आभार मानणं आणि त्याचवेळी भाजपवर केलेली टीका, या दोन्ही गोष्टींमुळे त्यांच्या वक्तव्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Web Title: Owaisi on gadkar asaduddin owaisi thanks nitin gadkari up politics aimim five mlas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • AIMIM
  • Asaduddin Owaisi
  • BJP
  • Nitin Gadkari
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Karjat Torent Project : टोरंट प्रकल्पावरून भाजप आक्रमक! ‘बाहेरच्यांनी येऊन लुडबुड करू नये’, दिला थेट इशारा
1

Karjat Torent Project : टोरंट प्रकल्पावरून भाजप आक्रमक! ‘बाहेरच्यांनी येऊन लुडबुड करू नये’, दिला थेट इशारा

Asaduddin Owaisi: राहुल गांधींना ‘पगलू’ म्हटल्यावर ओवैसींचं भन्नाट उत्तर; म्हणाले, ‘मी आणि बीवी पगलू…’
2

Asaduddin Owaisi: राहुल गांधींना ‘पगलू’ म्हटल्यावर ओवैसींचं भन्नाट उत्तर; म्हणाले, ‘मी आणि बीवी पगलू…’

Swiggy Partners With EV Industry : डिलिव्हरी बॉईजची कमाई वाढणार! स्विगीने सुरू केली भन्नाट ई-व्ही योजना; नितीन गडकरींकडून कौतुक
3

Swiggy Partners With EV Industry : डिलिव्हरी बॉईजची कमाई वाढणार! स्विगीने सुरू केली भन्नाट ई-व्ही योजना; नितीन गडकरींकडून कौतुक

Solapur News: भाजपवर प्रणिती शिंदेंची टीका!चोराच्या उलट्या बोंबा, डेटा सेंटरमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार
4

Solapur News: भाजपवर प्रणिती शिंदेंची टीका!चोराच्या उलट्या बोंबा, डेटा सेंटरमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.