Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttar Pradesh: योगी सरकारचा अडीच लाख कर्मचाऱ्यांना दणका; ‘या’ कारणासाठी रोखले पगार, जाणून घ्या

योगी सरकारने जवळपास अडीच लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रोखला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. योगी सरकारने जवळपास २ लाख ४४ हजार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रोखला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 03, 2024 | 02:55 PM
Uttar Pradesh: योगी सरकारचा अडीच लाख कर्मचाऱ्यांना दणका; 'या' कारणासाठी रोखले पगार , जाणून घ्या

Uttar Pradesh: योगी सरकारचा अडीच लाख कर्मचाऱ्यांना दणका; 'या' कारणासाठी रोखले पगार , जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रोखला आहे. योगी सरकारने जवळपास अडीच लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रोखला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. योगी सरकारने जवळपास २ लाख ४४ हजार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रोखला आहे. काही कालावधी आधी राज्य सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या संपत्तीची माहिती देण्यास सांगितले होते. ज्या कर्मचाऱ्यांनी संपत्तीची माहिती दिली नाही, त्यांचे सरकारने पगार रोखले आहेत,.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्य सचिवांनी राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत आपल्या संपत्तीची माहिती देण्यास सांगितले होते. यामध्ये कर्मचाऱ्यांना स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती संपदा पोर्टलवर द्यायची होती. त्यानुसार जवळपास ७० ते ७५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती संपदा पोर्टलवर भरली होती.

ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी संपदा पोर्टलवर माहिती भरलेली नाही अशा कर्मचाऱ्यांची टक्केवारी साधारणतः २० ते २५ टक्के असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने ज्या कर्मचाऱ्यांनी माहिती भरली नाही, अशा कर्मचाऱ्यांचे पगार रोखत त्यांच्यावर कारवाई केली आहे. राज्य सरकारने तब्बल २ लाख ४४ हजार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रोखला आहे.

(फोटो- istockphoto)

राज्य सरकारने ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रोखला आहे त्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. तिसरा क्रमांक हा महसूल विभागाचा आहे. या विभागासह अनेक विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती दिलेली नाही. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी संपत्तीची माहिती भरलेली नाही अशा कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याचे आदेश उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांनी दिले आहेत.

राज्य सरकारने १७ ऑगस्ट दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या संपत्तीची माहिती देण्याबाबत सूचना दिली होती. माहिती संपदा पोर्टलवर भरण्याची अंतिम मर्यादा ही ३१ ऑगस्ट होती. मात्र त्यानंतरही अनेक विभागांमधील कर्मचाऱ्यांनी माहिती न दिल्याने त्यांचे पगार सरकारकडून रोखण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानंतर ८ लाख ४६ हजार सरकारी कर्मचाऱ्यांपैकी जवळपास ६ लाख २ हजार कर्मचाऱ्यांनी आपल्या संपत्तीची माहिती पोर्टलवर दिली होती. त्यामध्ये कापड उद्योग, सैनिक कल्याण, ऊर्जा, क्रीडा आणि कृषी अशा अनेक विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. माहिती न देणाऱ्यांमध्ये शिक्षण व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: Up cm yogi aditynath government hold 2 lakh 44 thousand government employees salary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 02:51 PM

Topics:  

  • CM Yogi Adityanath
  • Uttar Pradesh news

संबंधित बातम्या

“मौलाना विसरला की UP मध्ये कोणाची…”; Bareilly Violence वर मुख्यमंत्री योगींचा स्पष्ट इशारा
1

“मौलाना विसरला की UP मध्ये कोणाची…”; Bareilly Violence वर मुख्यमंत्री योगींचा स्पष्ट इशारा

CM Yogi Death Threat: योगी आदित्यनाथांना महाराष्ट्रातून कुणी दिली जीवे मारण्याची धमकी…; नेमकं काय आहे प्रकरण?
2

CM Yogi Death Threat: योगी आदित्यनाथांना महाराष्ट्रातून कुणी दिली जीवे मारण्याची धमकी…; नेमकं काय आहे प्रकरण?

UP prohibits caste-based Politics : उत्तर प्रदेशमध्ये जात सांगणं पडणार महागात; योगी सरकारने दिला मोठा दणका
3

UP prohibits caste-based Politics : उत्तर प्रदेशमध्ये जात सांगणं पडणार महागात; योगी सरकारने दिला मोठा दणका

High Court News: संमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार मानले जाऊ शकत नाही ; उच्च न्यायालयाची टिपण्णी
4

High Court News: संमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार मानले जाऊ शकत नाही ; उच्च न्यायालयाची टिपण्णी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.