Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मौलाना विसरला की UP मध्ये कोणाची…”; Bareilly Violence वर मुख्यमंत्री योगींचा स्पष्ट इशारा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'विकसित उत्तर प्रदेश @2047'मध्ये कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी माफिया, दंगेखोर यांच्याविरुद्ध झीरो टॉलरेन्स नीतीबाबत सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 27, 2025 | 03:48 PM
"मौलाना विसरला की UP मध्ये कोणाची..."; Bareilly Violence वर मुख्यमंत्री योगींचा स्पष्ट इशारा

"मौलाना विसरला की UP मध्ये कोणाची..."; Bareilly Violence वर मुख्यमंत्री योगींचा स्पष्ट इशारा

Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये काल पोलिसांवर दगडफेक 
पोलीस अधीक्षक आशुतोष शिवम यांनी अश्रुधुराच्या फोडल्या नळकांड्या 
 घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती

Bareilly News: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात पुन्हा एकदा निदर्शने झाल्याचे पाहायला मिळत आहे. मौलाना तौकीर रझा यांचे समर्थक शुक्रवारी “आय लव्ह मुहम्मद” या घोषणेच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात जमले होते. अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आले असताना गर्दीतील एका व्यक्तीने पोलिसांवर दगडफेक केली, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला. प्रत्युत्तरात पोलिसांनी लाठीमार केला आणि गर्दी पांगवली. या घटनेवर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘विकसित उत्तर प्रदेश @2047’मध्ये कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशच्या विकासावर भाष्य केले. उत्तर प्रदेशमध्ये असणारे माफिया, दंगेखोर यांच्याविरुद्ध झीरो टॉलरेन्स नीतीबाबत सांगितले. 2047 पर्यंत उत्तर प्रदेशला 6 ट्रीलियन डॉलर ईकॉनॉमी अर्थव्यवस्था करण्याबाबत सांगितले.

#WATCH लखनऊ (यूपी): 'विकसित उत्तर प्रदेश विजन @ 2047' कार्यक्रम में मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने कहा," पर्व और त्योहारों के दौरान आपने देखा होगा कि जब भी पर्व आते थे तब उत्पाद शुरू हो जाता था। अब उत्पादियों और उपद्रवियों को पता लगेगा और उन्हें उनकी सात पीढ़ियां याद आएंगी क्योंकि… pic.twitter.com/YMXXnUnfmY — ANI_HindiNews (@AHindinews) September 27, 2025

बरेली येथील घटनेवर भाष्य करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “सत्तेत कोण आहे हे एक मौलाना विसरला होता. त्याने रस्ते बंद करण्याची धमकी दिली होती. मात्र आम्ही कर्फ्यू किंवा नाकेबंदी होणार नाही ही स्पष्ट केले. त्यांच्या भावी पिढ्या देखील दंगा करायचे विसरून जातील असा धडा आम्ही त्यांना शिकवला आहे. ” दंगलखोरांना 2017 नंतर कडक शिक्षा दिली आणि त्यांना समजणाऱ्या भाषेत धडा शिकवलं असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

मौलाना तौकीर रझा यांनी एक पत्र जारी

याबाबत एक औपचारिक पत्र देखील जारी केले. ज्यामध्ये म्हटले आहे की, “दुर्गा पूजा आणि दसरा उत्सवाबरोबरच उर्स-ए-सकलैनी आणि उर्स-ए-शहदाना वली देखील शहरात होत आहेत. आम्ही मुस्लिम समुदायाला शांतता राखण्याचे आणि हे कार्यक्रम रद्द करण्याचा विचार करण्याचे आवाहन करतो. आम्ही फक्त राष्ट्रपतींना उद्देशून जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर करू.”

‘I love Muhammad’ वरून बरेलीमध्ये निदर्शने, मौलाना तौकीर रझा यांच्या समर्थकांनी दगडफेक केली; पोलिसांचा लाठीचार्ज

मौलाना यांच्या समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक

आज दुपारी, मौलाना तौकीर रझा यांचे समर्थक पोलिस आणि प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आले तेव्हा गर्दीतील एका व्यक्तीने पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेक पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि गर्दीला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या, पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. लाठीचार्जमध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. सर्वांना रुग्णालयात नेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलिस आणि प्रशासन अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित आहेत.

Web Title: Uttar pradesh cm yogi aditynath statement to maulana tauqeer raza bareilly violence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 03:19 PM

Topics:  

  • bareilly news
  • CM Yogi Adityanath
  • crime news
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

इश्क है या दर्द? प्रेमप्रकरणात अपयशी तरुण 11 व्या मजल्यावर गेला अन्…; वाचा मन सुन्न करणारी घटना
1

इश्क है या दर्द? प्रेमप्रकरणात अपयशी तरुण 11 व्या मजल्यावर गेला अन्…; वाचा मन सुन्न करणारी घटना

अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती होताच..
2

अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती होताच..

Chaitanyananda: विद्यार्थिनींचा छेडछाड करणाऱ्या चैतन्यानंदविरुद्ध मोठी कारवाई; ८ कोटी रुपये जप्त, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
3

Chaitanyananda: विद्यार्थिनींचा छेडछाड करणाऱ्या चैतन्यानंदविरुद्ध मोठी कारवाई; ८ कोटी रुपये जप्त, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Navi Mumbai Crime : नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई ; 26.84 कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई ; 26.84 कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.