नवी दिल्ली: अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) वर निर्बंध लावल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी, हंगेरियन-अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्या संस्थांना USAID मार्फत 260 दशलक्ष डॉलर (26 कोटी डॉलर) मिळाले. या निधीचा उपयोग भारत आणि बांगलादेशासह अनेक देशांमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी आणि राजकीय घडामोडींवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात आला, असा दावा केला आहे. पण ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे भारतातही एकच खळबळ उडाली आहे. आता हा मुद्दा भारताच्या संसदेच्या चर्चेत आला आहे.
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार निशिकांत दुबे यांनी ‘USAID’ संस्थेने भारतात विभाजन घडवून आणण्यासाठी विविध संस्थांना निधी पुरवल्याचा दावा केला आहे. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही लोकसभेत केली आहे. निशिकांत दुबे यांनी काँग्रेसचे जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.
Jitendra Awhad : “खून हा खून असतो अन् खुनाला माफी नाही…”, सुरेश धसांवर बरसले जितेंद्र आव्हाड
निशिकांत दुबे म्हणाले की, अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘USAID’ संस्थेला पूर्णपणे बंद केले कारण ती अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या सरकारांना अस्थिर करण्यासाठी आर्थिक मदत करत होती. “USAID ने जॉर्ज सोरोसच्या ‘ओपन सोसायटी फाउंडेशन’ला पाच हजार कोटी रुपये भारतात फूट पाडण्यासाठी दिले का? त्यांनी राजीव गांधी फाउंडेशनला पैसा दिला का?”
दुबे यांनी पुढे प्रश्न केला की, ‘USAID’ ने तालिबानला निधी दिला का? तसेच, या संस्थेने दहशतवादी आणि नक्षलवादी गटांना आर्थिक सहाय्य केले का, याबद्दलही त्यांनी शंका व्यक्त केली. दुबे यांनी आरोप केला की, USAID ने भारतातील काही संस्थांना ‘मानवाधिकार’ आणि ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’च्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे.
Tech Tips: तुम्ही लॅपटॉपच्या वाय-फायचा पासवर्ड विसरला आहात का? वापरा ही सोपी ट्रिक
या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींना तुरुंगात टाकावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. दुबे यांच्या आरोपांवर काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार विरोध करत सभागृहात घोषणा दिल्या. काही सदस्यांनी हा मुद्दा प्रक्रियात्मक दृष्टीने उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र पीठासीन सभापती संध्या राय यांनी शून्य प्रहरात असे करता येत नसल्याचे स्पष्ट केले. दुबे यांनी यापूर्वीही संसदेत या मुद्द्यावर आवाज उठवला असून, त्यांनी सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राजीव गांधी फाउंडेशन आणि जॉर्ज सोरोस यांच्यातील संबंधांची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच फाउंडेशनला भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी USAID मार्फत निधी प्राप्त झाला होता का? असा प्रश्नही उपस्थित केला.
सॅम पित्रोदा यांसारख्या प्रमुख व्यक्तींनी हा निधी स्वीकारला होता का,असाही प्रश्न त्यांनी विचारला. तसेच, USAID ने बांगलादेश आणि नेपाळमध्ये काही संस्थांना आर्थिक सहाय्य दिले होते, ज्या लोकशाही आणि राष्ट्रीय हिताविरुद्ध कार्यरत असल्याचा आरोप आहे. यासोबतच भाजप नेत्यांनी राजीव गांधी फाउंडेशनवर असे लोक आश्रय घेत असल्याचा आरोप केला. ज्यांचे वेगळावादी चळवळी आणि संशयास्पद गतिविधींशी संबंध असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.