मुंबईतील ईडी ऑफिसमध्ये लागलेल्या आगीवर जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप (फोटो - सोशल मीडिया)
Jitendra Awhad On Suresh Dhas: परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलीस आणि आंदोलकांमध्ये मध्यस्थी केल्याबद्दल भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. ” एवढेच जर आपल्यामध्ये माफीची भावना असेल तर कृपया हिमालयात जाऊन साधूसंत व्हावे आणि वाल्मिकी कराडलाही माफ करावे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार धस यांच्यावर निशाणा साधला आहे.
सुरेश धस यांच्यावर टीका करताना जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, ल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात तीन मोठी प्रकरण झाली. एक अक्षय शिंदे प्रकरणात कोर्टाने मत नोंदवलं. सोमनाथ सूर्यवंशींची हत्या झाली. संतोष देशमुख यांची हत्या झाली. माझ्या दृष्टीने हे तीन खून आहे. यातील तीन खूनात ज्याने कोणी खून केला आहे, ते कोणीही असो त्यांना ती योग्य ते शिक्षा झाली पाहिजे. परभणी मध्ये कोणीच बोलायला तयार नाही, काही निवडक लोकच परभणी विषयी बोलतात. सोमनाथ सूर्यवंशी माणूस नाही का? त्याला आई नव्हती? पोटचा गोळा हरवल्याने त्याच्या आईला दुःख नसेल. त्या आईने सांगितलं की, तुमच्या सरकारचे दहा लाख रुपये नको… माझा मला पोरगा परत द्या.. सरकारने कधी गांभीर्याने घेतलं सोमनाथ सूर्यवंशीला? अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
तसेच किंबहुना विधानसभेमध्ये उत्तर द्यायला लागलं तो श्वासो श्वासाच्या त्रासामुळे मेला आहे. खरा सोमनाथ सूर्यवंशी त्याला मारण्यात आलं. तसा पोस्टमार्टम रिपोर्ट आहे. तो बेदम मारहाणीत बसलेल्या धक्क्यामुळे मेला असणार. अच्छा कुठे गेला सांगायला तयार नाही. तो मेला आहे, तो कारागृहात मेला आहे. तो पोलीस लॉकअप मध्ये मिळालेला नाही. मग तो कसा मेला? किती वाजता मेला? त्याला औषध कधी दिलं? त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं कधी? कुठली उत्तर सरकार द्यायला तयार नाही,असा सवाल यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
तसेच काही समविचारी संघटना आंबेडकरवादी संघटना यांनी लाँग मार्च काढला. परभणी ते नाशिक ते पाई ४०० किलोमीटर चालत आले. सरकारला तोपर्यंत जाग आली नाही. काल नाशिक मध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. मग सरकारने त्यांना खोटे नाटे आश्वासन दिले. परदेशी शिखर परदेशी नावाचे ऑफिसर आहे. त्यांच्या सहीने ते एवढे दिवस काय करत होतात, सोमनाथ सूर्यवंशीला मरून आज जवळजवळ अडीच महिने व्हायला आलेत. हे सरकार झोपलो होतो का? या सरकारला छोट्या समाजाबद्दल काही वाटत नाही का? तो काय अशिक्षित पोरगा होता का? तो लॉ चां विद्यार्थी, कट्टर आंबेडकरवादी होता. मी कोरोना मध्ये आजारी होतो. तो माझा ओळखीचा नाही पाळखीचा नाही. मी गंभीर रित्या आजारी आणि माझी वाचण्याची क्षमता कमी आहे. तेव्हा त्या सोमनाथ सूर्यवंशीने ट्विट केलं होतं. फेसबुक वर लिहिलं होतं. जितेंद्र आव्हाड लढवय्या योद्धा आहे. हा लढवय्या कार्यकर्ता आहे.हा सोमनाथ सूर्यवंशी माझा विचारांनी भाऊ लागतो. त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नव्हतं.
आज जेव्हा मुंबईकडे जी काही कूच होणार आहे, त्यामुळे सरकारने काही उद्योग केले. काहीतरी लिहून दिलेलं आहे. माझ्याकडे पत्र देखील आहे. आज कसं काय सस्पेंड करतात लोकांना? आधी का नाही केलं? अधिकारी गुन्हेगार नव्हते हे प्रकरण दडपण्यासाठी म्हणून सरकार दलाचा हस्तक हस्तकांचा उपयोग करताय. आम्ही हे प्रकरण दाबून देणार नाही. कोणी केला लाठी चार्ज? कोणी केलं कोंबिंग ऑपरेशन? त्याची काही उत्तर नाही द्यायची, जे आयपीएस ऑफिसर जबाबदार आहे. ज्यांनी लाठीचार्ज चा हुकूम काढला ते दोशी नाही. चार हवालदारांना काढलं तर काम संपल असल्याचे यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
अक्षय शिंदे मागासवर्गीय यांचा त्याला न्याय नाही देणार. कोर्टात त्याच्या आईवडिलांना सांगायला लावतात की, आम्हाला खटला नाही चालवायचा, हे कुठल्या लेवलला चालला आहे. हिंदी पिक्चरचा डायलॉग आठवेल लोकांना. गरीबो की जान जान नही होती. आम्ही लढू अक्षय शिंदे, सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख साठी देखील लढू. खून खून आहे. आणि ते कोणाचाही असो. जे कोणी खून करतो त्याला सजा झालीच पाहिजे. तुम्ही शोधा तिथे कोण गेलं होतं? ते एवढे दिवस कुठे गेले होते? आधी का नाही गेले? ते असं कसं बोलू शकतात हे माफ करा. माफ करा अरे वा! हे साधू संतांची अवलाद आहे. खुण्याला माफ करा. सेकंड इयर मध्ये लॉ करणारा विद्यार्थी जातो. आपण माफ करून टाकायचं अरे वा! माफ करा असं कोणी घरातला मेला तर माफ करणार का , बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसार न्याय समान असतो, असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे.