
नाशिकरोडला तिरंगी, चौरंगी लढत रंगणार; महापालिका, पक्षात वर्चस्व राखण्यासाठी मातब्बरांची कसोटी लागणार
विश्वजीत शहाणे, नाशिक रोड : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, विविध राजकीय पक्षांनी आपापल्या बालेकिल्ल्यांमध्ये मोर्चेबांधणी पूर्ण केली आहे. प्रभाग क्रमांक १७ ते २२ मधील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची नावे समोर आली असून, अनेक प्रभागांमध्ये तिरंगी तर कुठे चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.
महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारीसाठी मातब्बरांची कसोटी लागली होती, मंगळवार (दि. ३०) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता कोण कोणासमोर लढणार हे स्पष्ट झाले आहे. खऱ्या अर्थाने आता राजकीय रणधुमाळीला सुरूवात होणार आहे.
प्रभाग क्रमांक १७ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, या प्रभागात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
उद्धव ठाकरे गट: मंगेश मोरे, मंगला आढाव, प्रमिला मैद, शैलेश ढगे
भाजप : दिनकर आढाव, प्रशांत दिवे, शोभा सातभाई, नीलम गडाख,
शिंदे सेना: राजेश आढाव, विजेता राहुल डावरे, राहूल कोथमीरे, सुशीला लोखंडे.
वंचित बहुजन आघाडी: संदीप काकड.
प्रभाग क्रमांक १८ जुन्या जाणत्यांची लढत
भाजप: विशाल संगमनेरे, शरद मोरे, ज्योती माळवे, सुशीला बोराडे
शिंदे सेना सुनील बोराडे, रंजना बोराडे, शितल ताकाटे, सुनीता भोजने, आशा पवार,
उद्धव ठाकरे गटः चित्रा ढिकले, संजय ढिकले, प्रशांत भालेराव. (सोबत मनसेच्या रोहिणी पिल्ले यांची चर्चा).
प्रभाग क्रमांक १९ चौरंगी लढतीचे संकेत
भाजप: योगेश ताजनपुरे, स्वाती वाकचौरे, हेमांगी भागवत.
उद्धव ठाकरे गटः योगेश भोर, भारती ताजनपुरे, रुचिका साळवे.
शिंदे सेनाः पंडित आवारे, जयश्री खर्जुल, विशाखा भडांगे.
प्रभाग क्रमांक २० वर्चस्व राखण्यासाठी चुरस
भाजप संभाजी मोरुसकर, सीमा ताजने, सतीश निकम, जयश्री गायकवाड
उद्धव ठाकरे गट हेमंत गायकवाड, योगिता गायकवाड, अश्विन पवार, गायत्री गाडेकर (श.प. गट).
शिंदे सेना: कैलास मुदलियार, सुप्रिया कदम, दुर्गा चिडे, पी. के. बागूल.
प्रभाग क्रमांक २१ महायुतीविरुद्ध ठाकरे गट
या प्रभागात अजित पवार गटाची एन्ट्री झाल्याने लढत रंजक होणार आहे.
शिंदे सेना व राष्ट्रवादी (अजित पवार): सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, ज्योती खोले आणि नयन वाघ (राष्ट्रवादी).
उद्धव ठाकरे गट प्रशांत जाधव, सुधाकर जाधव, अश्विनी आवटे, अनिता निकाळे. भाजप नितीन खोले, श्वेता भंडारी, कोमल महरोलिया, जयंत जाचक,
प्रभाग क्रमांक २२ स्थानिक प्रश्नांवरून रणधुमाळी
उद्धव ठाकरे गट: केशव पोरजे, योगेश गाडेकर, संजीवनी हंडोरे, वैशाली दाणी. राष्ट्रवादी काँग्रेस विक्रम कोठुळे, गणेश खर्जुल, दीपाली कोरडे, संध्या पवार, भाजप: श्याम गोहाड, सुनिता कोठुळे, नयन घोलप (वालझाडे), मीनाक्षी जाधव सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, आता पप्रचाराच्या रिंगणात कोण बाजी मारणार, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. बंडखोरी थोपवणे हे सर्वच पक्षांसमोर मोठे आव्हान आहे.