
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची समाजवादी पक्षावर टीका
उत्तर प्रदेशमध्ये सुरू आहे हिवाळी अधिवेशन
कफ सीरफवरुन विधानसभेत गोंधळ
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कफ सिरफचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोडीनयुक्त कफ सिरफच्या मुद्द्यावरून समाजवादी पार्टीवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोडीनयुक्त सिरफमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, राज्यात कोडीनयुक्त सिरफमुळे एकही मृत्यू झाला नाही. तर तामिळनाडू तयार केल्या जाणाऱ्या कफ सिरफमुळे अन्य राज्यात मृत्यू झाले. विशेष कार्य दल म्हणजेच एसटीएफने ज्यांना पकडले त्या प्रमुख घाऊक विक्रेत्यांना समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात परवानगी देण्यात आली होती.”
सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी दिल्ली आणि यूपीमधील नेत्यांची तुलना केली. ते म्हणाले, “देशात दोन नमुने आहेत, त्यापैकी एक इथे बसले आहेत.” विरोधकांवर उपरोधिक टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, “त्यांना वाटते की येथील ‘बबुआ’ लवकरच इंग्लंडला फिरायला जाणार आहेत. देशांमध्ये कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा होते तेव्हा काही लोक परदेशात लगेच निघून जातात. ” यानंतर समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी सभात्याग केला.
‘नमूना’ शब्दावरून सभागृहात गोंधळ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभागृहात नमुना शब्दाचा उल्लेख केला. यावरून सभागृहात एकच गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेत्याने यावर आक्षेप घेतला. राजकारण्यांविरुद्ध अशी भाषा का वापरली जात आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांनी कोणाचे नाव घेतले नसल्याचे स्पष्ट केले.
Yogi Adityanath : देशाला विकसित भारत बनविण्याचा मोदींचा संकल्प: मुख्यमंत्री योगी
देशाला विकसित भारत बनविण्याचा मोदींचा संकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील वारसा, विकास आणि गरीब कल्याणाच्या परंपरेला बळकटी देत सध्याच्या पिढीला नवी प्रेरणा दिली असून देशाला “विकसित भारत” म्हणून स्थापन करण्याचा दृष्टीसंकल्प दिला असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुजरातमधील एकता नगर येथे आयोजित भारत पर्व समारंभात बोलतांना सांगितले. मुख्यमंत्री योगी म्हणाले की पंतप्रधान मोदी काशीचे प्रतिनिधित्व संसदेत करतात. काशी विश्वनाथ धामाच्या पुनर्निर्माणानंतर दरवर्षी ११ ते १२ कोटी भाविक काशीला भेट देतात. ”