
मोठी बातमी ! विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये भीषण दुर्घटना; 1500 डिग्री तापलेल्या द्रव पोलाद अंगावर कोसळल्याने 9 कामगारांचा मृत्यू
Visakhapatnam Steel Plant : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये (Visakhapatnam Steel Plant) एक भीषण अपघात घडला आहे. प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणात उकळते द्रव स्टील (वितळलेले लोखंड) उचलत असताना ही घटना घडली. या भीषण अपघातात आतापर्यंत नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच इतर कामगार गंभीररित्या भाजले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, स्टील प्लांटच्या SMS-2 आणि STC-3 या उष्णता प्रक्रिया युनिट्समध्ये क्रेन उकळते द्रव स्टील उचलत असताना हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १,५०० अंश सेल्सिअसच्या अतिउच्च तापमानावर उकळणारा हा धातूचा द्रव असलेला लॅडल (मोठे भांडे) अचानक अनियंत्रितपणे हलला, ज्यामुळे उकळते गरम स्टील कामगारांवर पडले. द्रव स्टील सांडल्याने कामगार घाबरून पळून गेले. स्टील प्लांटचे अग्निशमन दल आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे.
राज्याच्या गृहमंत्री वंगलपुडी अनिता यांनी विशाखापट्टणम स्टील प्लांटमधील अपघातावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी जिल्हाधिकारी आणि शहर पोलीस आयुक्त यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि स्टील प्लांट अपघाताची माहिती घेतली. गृहमंत्रींच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या (PRO) म्हणण्यानुसार, त्यांनी अधिकाऱ्यांना जखमींवर सर्वोत्तम उपचारांची व्यवस्था करण्याचे आणि अपघातस्थळी बचाव व मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिले. घटनेची माहिती मिळताच, गृहमंत्री तात्काळ अपघातस्थळी पोहोचल्या आणि अधिकाऱ्यांशी फोनवर सतत संवाद साधत त्यांना विविध सूचना देत आहेत.
Amaravati, Andhra Pradesh | Vangalapudi Anitha, State Home Minister, responded to the accident at the Visakhapatnam Steel Plant. She spoke over the phone with the Visakhapatnam District Collector and the City Police Commissioner and enquired about the details related to the steel… https://t.co/XaEm41vKYp — ANI (@ANI) June 8, 2026
कामगार संघटनेचे नेते एन. अयोध्याराम म्हणाले, “आम्हाला संशय आहे की आग स्फोटामुळे लागली असावी, परंतु नेमके कारण निश्चित करण्यासाठी सखोल चौकशी आवश्यक आहे. मृत व्यक्ती स्टील प्लांटचे कंत्राटी कामगार होते की कायम कर्मचारी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.”
मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी अपघातावर दुःख आणि शोक व्यक्त केला. त्यांनी घटनास्थळावरील अधिकाऱ्यांशी थेट फोनवर संवाद साधला आणि मृतांबद्दल शोक व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सद्यस्थिती आणि सुरू असलेल्या मदत कार्याची माहिती दिली. जलद आणि कार्यक्षम बचाव व मदतकार्य सुनिश्चित करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी एकत्रितपणे काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
West Bengal Politics: तृणमूल काँग्रेसमध्ये भुकंप; दोन खासदारांचे राजीनामे, २० हून अधिक नॉट रिचेबल