बिहार निवडणुकीआधी नितीश कुमारांची मोठी खेळी; उच्चवर्णीयांच्या विकासासाठी आयोगाची स्थापना
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यावरून जोरदार चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, आता यावर नितीशकुमार यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, ‘आम्ही दोनदा चुकून इकडेतिकडे गेलो होतो. आता नेहमीच सोबत राहू आणि बिहारसोबतच देशाचा विकास करू’. असे म्हणत नितीशकुमार यांनी राजकीय वर्तुळातील उलटसुलट चर्चांना एकप्रकारे पूर्णविरामच दिला.
प्रगती यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात शनिवारी गोपालगंजमध्ये पोहचलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमारांनी त्यांच्या पुन्हा रालोआला सोडचिठ्ठी देणार असल्याबाबतच्या सुरू चर्चावर मौन सोडले. नितीश कुमार म्हणाले, आधी हिंदू-मुस्लीम यांच्यातील वादाच्या बातम्या येत होत्या. मात्र, जेव्हापासून बिहारच्या जनतेने आम्हाला काम करण्याची संधी दिली, तेव्हापासून बिहारची परिस्थिती बदलली आहे. प्रत्येक क्षेत्रात विकासाचे काम सुरू आहे. कोणासोबतही भेदभाव केला जात नाही. आम्ही मिळून बिहारला पुढे नेत आहोत.
दरम्यान, बिहारचा कोणताही भाग विकासापासून दूर नाही. आम्ही शिक्षण, आरोग्य, रस्ते, पूल निर्माणाचे मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. ज्यामुळे बिहारमधील कोणत्याही कोपऱ्यातून लोक पाटणाला सहा तासांत पोहचत होता. आता हा कालावधी कमी होवून पाच तासांवर आला आहे. यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
नितीशकुमारांच्या पाठिंब्याने केंद्रात मोदींचे सरकार
नितीशकुमारांच्या पाठिंब्याने केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर आहे. आठवडा-दहा दिवसांपूर्वी अमित शहा यांनी बोलावलेल्या बैठकीलाही नितीश कुमार यांनी उपस्थित राहणे टाळले, तर एनडीए सरकारमध्ये नितीश कुमार यांच्यासारखीच भूमिका बजावणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपस्थित होते.
भाजप जदयूचे 10 खासदार फोडतंय : संजय राऊत
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेड भाजपासोबतची युती तोडेल. नितीशकुमारांच्या दहा खासदारांना भाजप आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा त्यांनी केला. बिहारमध्ये भाजप आपल्या मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. भाजप बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत युती करीत आहे, पण आता ते जेडीयूच्या १० खासदारांना आपल्या गोटात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे नितीश कुमार अस्वस्थ आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.