Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिजाब घालण्यास मनाई नाही, प्रश्न शाळांमधील बंदीचा…

हिजाब घालण्यापासून कोणीही रोखत नाही. तुम्हाला हवे तिथे तो घालता येतो. फक्त शाळेत बंधन आहे. आमचा प्रश्न फक्त शाळेशी संबंधित आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 08, 2022 | 01:19 PM
हिजाब घालण्यास मनाई नाही, प्रश्न शाळांमधील बंदीचा…
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : कर्नाटक हिजाब बंदीप्रकरणी (Karnataka Hijab Ban) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कान उघाडणी केली आहे. हिजाबचा प्रश्न फक्त शाळांमधील बंदीचा आहे, इतर कोठेही परिधान करण्यास मनाई नाही. राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील (Educational Institute) हिजाबवरील बंदी उठवण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) नकार दिला होता. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय विचार करीत आहे.

ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडत न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाला हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे (Constitutional Court) पाठवण्याची विनंती केली. त्यांनी युक्तिवाद केला की, घटनेच्या कलम १९, २१ किंवा २५ नुसार एखाद्या मुलीने हिजाब घालण्याचा निर्णय घेतला तर सरकार तिच्यावर असे निर्बंध घालू शकते का? यावर खंडपीठाने म्हटले की, प्रश्न असा आहे की, तुम्हाला हिजाब घालण्यापासून कोणीही रोखत नाही. तुम्हाला हवे तिथे तो घालता येतो. फक्त शाळेत बंधन आहे. आमचा प्रश्न फक्त शाळेशी संबंधित आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

देवदत्त कामत यांनी चर्चेदरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या घटनात्मक न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ दिला, ज्या मुलीला शाळेत नथ घालायची होती. यावर न्यायमूर्ती गुप्ता म्हणाले, माझ्या माहितीनुसार नथ कोणत्याही धार्मिक प्रथेचा भाग नाहीत. खंडपीठाने म्हटले की, जगभरातील महिला कानातले घालतात, मात्र हा धार्मिक प्रथेचा विषय नाही. न्यायमूर्ती गुप्ता म्हणाले, माझे मत आहे की आपल्या देशात अशा प्रकारचे वैविध्य इतर कोणत्याही देशात अस्तित्वात नाही.

खंडपीठ आजही याप्रकरणी युक्तिवाद ऐकणार आहे. उच्च न्यायालयाच्या १५ मार्चच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात असे म्हटले होते की, हिजाब घालणे हा अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा भाग नाही, ज्याला घटनेच्या कलम २५ अंतर्गत संरक्षित केले जाऊ शकते.

Web Title: Wearing hijab is not prohibited but the question of ban in schools nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2022 | 01:19 PM

Topics:  

  • Karnataka High Court
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली
1

Supreme Court on Firecrackers: दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; ‘फटाक्यांवर पूर्ण बंदी शक्य नाही’, मात्र ही अट घातली

Supreme Court News: दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी 3 वर्षांच्या वकिली सरावाची अट रद्द: सर्वोच्च न्यायालय
2

Supreme Court News: दिवाणी न्यायाधीश होण्यासाठी 3 वर्षांच्या वकिली सरावाची अट रद्द: सर्वोच्च न्यायालय

Karnataka High Court on X: ‘भारतात काम करण्यासाठी कायद्याचे पालन करावेच लागेल’; कर्नाटक उच्च न्यायालयाचा ‘एक्स’ला दणका
3

Karnataka High Court on X: ‘भारतात काम करण्यासाठी कायद्याचे पालन करावेच लागेल’; कर्नाटक उच्च न्यायालयाचा ‘एक्स’ला दणका

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश
4

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.