
West Bangal : दहशतवादी कनेक्शनच्या संशयात एक जण ताब्यात, एनआयएची मोठी कारवाई
मोहम्मद शेख मुळ रुपात याच जिल्ह्यातील मोंटेस्वर परिसरातील कुलुत गावचा राहणारा आहे. सुत्रांच्या मते, एनआयएच्या एका पथकाने स्थानीक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी सकाळी पालिशग्राम पुरबापारा मशीदमध्ये सर्च ऑपरेशन चालवले आणि शेखला ताब्यात घेतले. त्यानंतर शेखच्या खोलीचा तपास केला गेला, जिथे एक डायरी व मोबाइल एनआयएच्या हाती लागली आहे.
सुत्रांच्या मते, एजन्सीला शेखच्या डायरीत अनेक बांगलादेशचे नंबर मिळालेत. चौकशीनंतर इमाम शेखला मशिदीतून ताब्यात घेत मंगलकोट पोलीस स्थानकात आणण्यात आले. एनआयएचे अधिकारी शेखकडून जास्तीत जास्त माहिती प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहेत.
शेखच्या अटकेमुळे स्थानिक लोक संभ्रमात आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मागील तीन वर्षांपासून शेख हा मशिदीत कार्यरत होता. बांगलादेशातील दहशतवादी संघटनांसोबतच्या त्याच्या संबंधांबाबत विचारही करता येत नाही.
दरम्यान, मशीदचे कमिटी सदस्य गुलाम मुस्तफा व इतर काही गावकऱ्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेला इमाम नेहमीच बांगलादेशला जायाचा. एक ग्रामस्थ म्हणाले की, नुकतेच तो बांगलादेशात गेला होता. काही महिन्यांपूर्वीच तो पुन्हा पालिशग्रामला पोहचलेला.
एनआयए बांगलादेश स्थित दहशतवादी संघटना जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी)च्या भारतातील कथित स्लीपर सेलचा तपास करत आहे. मंगळवारची छापेमारी आणि शोध मोहिम शेजारील राज्य आसाममध्ये नोंदवण्यात आलेल्या एका प्रकरणासाठी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच इमामच्या अटकेनंतर एनआयए यासंदर्भात आणखीन कोठे तपास करणार याबाबाबत सर्वत्र चर्चा सुुरू झाली आहे.
एकदा वापरून फेकायचे नाही! भारत बनवणार Reusable Rocket; अग्निकुलला २०० कोटींची मदत