एकदा वापरून फेकायचे नाही! भारत बनवणार Reusable Rocket; अग्निकुलला २०० कोटींची मदत
या २०० कोटी रुपयांच्या निधीचा सरळ अर्थ असा की, भारत आता एलॉन मस्कच्या ‘स्पेसएक्स’ सारखे रॉकेट तयार करण्याच्या दिशेने आक्रमकपणे वाटचाल करत आहे, जे उपग्रहांना अवकाशात प्रक्षेपित करू शकेल, पृथ्वीवर परत आणू शकेल आणि त्यांना पुन्हा प्रक्षेपित करण्यासाठी वापरले जाऊ शकेल. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी तंत्रज्ञान विकास मंडळ आणि अग्निकुल कॉसमॉस यांच्यात २०० कोटी रुपयांचा करार झाला आहे. ही भरीव रक्कम संशोधन, विकास आणि नवोपक्रम निधी अंतर्गत प्रदान करण्यात आली आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे. भारताला व्यावसायिक अवकाश प्रक्षेपणांचे जागतिक केंद्र बनवणे, हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
टीआरएल-४ ते टीआरएल-८ पर्यंतचा प्रवास
या २०० कोटी रुपयांच्या ‘सरकारी बूस्टर’च्या मदतीने, अग्निकुल आपले सध्याचे तंत्रज्ञान टीआरएल-४ (टेक्नॉलॉजी रेडीनेस लेव्हल) वरून थेट टीआरएल-८ च्या प्रगत स्तरावर नेईल. यामध्ये पुनर्वापर करण्यायोग्य वरचा टप्पा, सेमी-क्रायोजेनिक लिक्विड प्रोपल्शन, डीप थ्रॉटलिंग, रीस्टार्ट क्षमता आणि अचूक अवतरण प्रोपल्शन प्रणाली यांसारख्या उच्च-तंत्रज्ञान वैशिष्ट्यांचा समावेश असेल. सरकारने ही २०० कोटी रुपयांची बाजी कोणत्याही नवख्या कंपनीवर लावलेली नाही. अग्निकुल कॉसमॉसने आधीच आपली ताकद सिद्ध केली आहे. कंपनीने ‘अग्निलेट’ नावाचे, जगातील पहिले एकसंध श्डी प्रिंटेड रॉकेट इंजिन स्वतःच्याच कारखान्यात डिझाइन करून तयार केले. इतकेच नव्हे तर, मे २०२४ मध्ये, कंपनीने आपल्या ‘अग्निबान संॉटेंड’ या एक-स्तरीय वाहनाचे पहिले उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केले. टीडीबीने यापूर्वी अग्निकुलला लहान उपग्रह वाहने विकसित करण्यात मदत केली आहे.
तांदळाच्या दरात पुन्हा वाढले; बासमती तांदळाच्या दरात 15 ते 20 टक्क्यांची वाढ
पहिला टप्पाच नव्हे, संपूर्ण प्रणाली पुनर्वापर करण्यायोग्य
अग्निकुलचा प्रकल्प रॉकेटचा पहिला टप्पा पृथ्वीवर परत आणण्यापुरता मर्यादित नाही. संपूर्ण प्रक्षेपण प्रणाली शक्य तितकी पुनर्वापर करण्यायोग्य बनवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यामुळे भविष्यात रॉकेट प्रक्षेपणांची वारंवारता अनेक पटींनी वाढेल.






