
West Bengal Verdict 2026: Saffron Surge Topples Mamata Banerjee; BJP Crosses Majority with 185+ Leads
West Bengal Election Result 2026 Live: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. यात पश्चिम बंगालच्या जनतेने तृणमूल काँग्रेस पराभवाच्या मार्गावर असून भाजपची मात्र विजयाच्या दिशेने घौदडौद सुरू झाली आहे. सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर काही काळ मोठी चढाओढ पाहायला मिळाली. पण दुपारनंतर आता परिस्थिती झपाट्याने बदलत असल्याचे दिसत आहे. भाजपने निर्णायक आघाडी घेतली असून राजकीय समीकरण पूर्णपणे उलथवून टाकले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भाजप १९५ जागांच्या आघाडीसह स्पष्ट बहुमताच्या खूप पुढे आहे, तर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी केवळ ९२ जागांपुरती मर्यादित राहिली आहे.
हे कल पाहता, बंगालमध्ये “भाजप त्सुनामी” ही आता केवळ एक राजकीय घोषणा राहिलेली नाही, तर भाजप पश्चिम बंगालमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरूवात केली आहे. २९४ जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा १४८ आहे, जो भाजपने खूप मागे टाकला आहे. पण भाजप २०० जागांचा टप्पा ओलांडू शकेल का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत मोठे राजकीय चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांना मोठा फटका बसताना दिसत असून, भाजप ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे चित्र आहे.
उपलब्ध कलांनुसार, टीएमसीने २९१ जागांवर निवडणूक लढवून सुमारे ३४ टक्क्यांची कामगिरी नोंदवली आहे, जी मागील निवडणुकीच्या तुलनेत लक्षणीय घट मानली जात आहे. दुसरीकडे, सर्व २९४ जागांवर उमेदवार उभे केलेल्या भाजपने तब्बल १८५ जागांवर आघाडी घेतली असून, राज्यात सत्तांतर जवळपास निश्चित मानले जात आहे.
दरम्यान, डावे पक्ष आणि काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. काँग्रेसला खातेही उघडता आले नसून, एकेकाळी बंगालमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या सीपीएमला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागत आहे.
Tamilnadu Assembly Election 2026 Result: तामिळनाडूचा नवा ‘थलैवा’ कोण?
राजकीय विश्लेषकांच्या मते, सध्याचा कल कायम राहिल्यास भाजप १९० चा टप्पा सहज पार करू शकतो आणि अंतिम फेरीत २०० जागांपर्यंतही मजल मारू शकतो. मात्र, काही मतदारसंघांमध्ये लढत अजूनही अटीतटीची असून, तेथे निकालात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही निवडणूक केवळ सत्तापालटाचे संकेत देत नाही, तर बंगालच्या राजकारणातील मोठ्या स्थित्यंतराचेही द्योतक ठरत आहे. दीर्घकाळ राज्यावर वर्चस्व राखणाऱ्या टीएमसीसाठी हा मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे, तर भाजपसाठी हा ऐतिहासिक विजय ठरू शकतो.
सध्या सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की भाजप २०० जागांचा जादुई आकडा गाठते की त्याआधीच ही लाट थांबते.