Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bengal BJP Manifesto : दरमहा मिळणार 3 हजार; महाराष्ट्रानंतर बंगालमध्येही भाजपचा तोच फॉर्म्युला? भाजपकडून पैशांची खैरात

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा संकल्पनामा जाहीर झाला आहे. यामध्ये मध्यमवर्गीय महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 10, 2026 | 04:22 PM
West Bengal Elections BJP Manifesto Monthly 3,000 rs Middle-Class Women political news

West Bengal Elections BJP Manifesto Monthly 3,000 rs Middle-Class Women political news

Follow Us
Follow Us:

Bengal Election BJP Manifesto : कोलकाता : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका होत आहे. यामधील सर्वात जास्त पश्चिम बंगालच्या निवडणूकांची चर्चा रंगली आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये (BJP Politics) जोरदार वाद-विवाद सुरु आहे. दरम्यान, भाजपने पश्चिम बंगालमधील जनतेला आश्वासनांची खैरात वाटली आहे. संकल्प पत्र जाहीर करत त्यांनी महिलांना आकर्षित योजना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्राप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election) देखील दर महिना पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालच्या राजकारणात महिला आणि युवा मतपेढी हा सर्वात निर्णायक घटक बनला आहे. राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजपने’संकल्प पत्र’ प्रसिद्ध केले आहे. ममता बॅनर्जी यांच्या लोकप्रिय ‘लक्ष्मी भंडार’ योजनेच्या प्रभावाला तोंड देण्यासाठी आणि मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपने अनेक मोठ्या आर्थिक घोषणा केल्या आहेत. यामध्ये, भाजपने मध्यम आणि निम्नवर्गीय महिलांना दरमहा ३००० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मोठे आश्वासन दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये देखील महिलांना दरमहिना पैसे देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.

हे देखील वाचा : “सरकारकडे पैसे नसतील, तर लाडकी बहीण योजना बंद करा…; हाय कोर्टाने फटकारले

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक जिंकण्यामध्ये लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. महायुतीच्या तिन्ही पक्षांनी या योजनेचा जोरदार प्रचार केला होता. याचप्रमाणे आता पश्चिम बंगालमध्ये देखील महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा : नाशिक महिला पोलिसांचे ‘अंडरकव्हर’ ऑपरेशन; ‘ते’ आठ दिवस अन् धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश

मध्यम आणि निम्नवर्गीय महिलांना आणि बेरोजगार तरुणांनाही दरमहा ३,००० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय, माता आणि बाळ दोघांचेही आरोग्य आणि पोषण सुनिश्चित करण्यासाठी गर्भवती महिलांना २१,००० रुपयांची एक-वेळ मदत जाहीर करण्यात आली आहे. सत्तेत आल्यास ही मदत रक्कम आणखी वाढवण्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जोरदार राजकीय शह देण्यासाठी भाजपने डाव आखला आहे.

ममता बॅनर्जींच्या ‘लक्ष्मी भांडार’ आणि युवा साथी योजनेवर टीका

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची ‘लक्ष्मी भांडार’ योजना ही पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या (TMC) मजबूत पकडीमागील एक मोठा ‘मास्टरस्ट्रोक’ मानली जाते. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यात रोख रक्कम दिली जाते. बंगालमधील महिला मतदारांना TMC च्या बाजूने संघटित करण्यात या योजनेने मोठी भूमिका बजावली आहे.

काय आहे योजना? 

लक्ष्मी भंडार योजना पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी सरकारने २०२१ मध्ये प्रथम सुरू केली. सुरुवातीला, सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांना दरमहा ₹१,००० आणि अनुसूचित जाती/जमातीतील महिलांना ₹१,२०० दिले जात होते. फेब्रुवारी २०२६ च्या निवडणूक अर्थसंकल्पात, ही रक्कम सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ₹१,५०० आणि अनुसूचित जाती/जमातीतील महिलांसाठी ₹१,७०० पर्यंत वाढवण्यात आली. सध्या अंदाजे २४.२ दशलक्ष महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.

Web Title: West bengal elections bjp manifesto monthly 3000 rs middle class women political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Mamata Banerjee
  • west bengal assembly election

संबंधित बातम्या

West Bengal Politics : ममता बॅनर्जी यांनी बंडखोरांना दिले आव्हान; कोर्टात जाण्याचाही दिला इशारा
1

West Bengal Politics : ममता बॅनर्जी यांनी बंडखोरांना दिले आव्हान; कोर्टात जाण्याचाही दिला इशारा

West Bengal Politics : तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी; ममता बॅनर्जींना धक्का
2

West Bengal Politics : तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी; ममता बॅनर्जींना धक्का

‘ममता बॅनर्जींचे सरकारच गेले नाही, तर आता…’, ममता बॅनर्जींच्या पक्षातील फुटीवर शिंदे गटाचे नेत्याचे मोठे वक्तव्य
3

‘ममता बॅनर्जींचे सरकारच गेले नाही, तर आता…’, ममता बॅनर्जींच्या पक्षातील फुटीवर शिंदे गटाचे नेत्याचे मोठे वक्तव्य

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट; बंडखोर ऋतब्रत बॅनर्जी बनले नवे विरोधी पक्षनेते
4

West Bengal Politics: पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट; बंडखोर ऋतब्रत बॅनर्जी बनले नवे विरोधी पक्षनेते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.