Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परीक्षेचं टेन्शन येत असेल तर काय करावं?;PM मोदी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सोशल मीडियावरुन सहभागी झाले होते. मनातून बोर्ड परीक्षेची भीती निघून जावी यासाठी मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 27, 2023 | 05:11 PM
परीक्षेचं टेन्शन येत असेल तर काय करावं?;PM मोदी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
Follow Us
Close
Follow Us:

विद्यार्थ्यांनी (Students) वेळेचं व्यवस्थापन करा, यश नक्की मिळेल असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशभरातल्या विद्यार्थ्यांना दिला. पंतप्रधानांनी आज एकाच वेळी तब्बल 38 लाख विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला. पालकांनी सामाजिक अपेक्षांचा दबाव विद्यार्थ्यांवर टाकू नये असा सल्ला त्यांनी पालकवर्गाला दिलाय. पालकांच्या अपेक्षा चूक नाहीत. अगदी राजकारण्यांवरही अपेक्षांचं ओझ असतं असा टोला त्यांनी मारला.

विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. देशभरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सोशल मीडियावरुन सहभागी झाले होते. मनातून बोर्ड परीक्षेची भीती निघून जावी यासाठी मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

तुमच्यातील ताकदच तुम्हाला पुढे नेईल

जे विद्यार्थी मेहनत करतात त्यांच्या आयुष्यात बदल होतोच. एखादा विद्यार्थी कॉपी करून तुमच्या पेक्षा दोनचार मार्क अधिकचे मिळवेलही. परंतु, तो कधीच तुमच्या आयुष्यात अडसर ठरणार नाही. तुमच्यातील ताकदच तुम्हाला पुढे घेऊन जाईल, असंही ते म्हणाले.

कॉपी करू नका

कॉपी करण्यासाठी काही विद्यार्थी वेगवेगळे प्रयोग करतात. मात्र, त्याने फायदा होत नाही. तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. आज तुम्हाला प्रत्येक ठिकाणी परीक्षेला सामोरे जावं लागतं. कुठपर्यंत कॉपी कराल. कॉपी करून आज तुम्ही पुढे जाल. पण आयुष्यात कधीच पुढे जाणार नाही, असंही ते म्हणाले.

शॉर्ट कट वापरू नका

तुम्ही मेहनत करा. परीक्षा येतात आणि जातात. आपल्याला आयुष्य जगायचं आहे. आपल्या शॉर्टकटमध्ये जायचं नाही. जर कोणी शॉर्ट कटचा मार्ग अवलंबत असेल तर तुम्ही तुमच्यावर फोकस करा, असा सल्ला त्यांनी दिला.

तो विषय आधी वाचा

काम केलं नाही तर थकवा जाणवतो. काम केल्याने आनंद वाटला पाहिजे. टाइम मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे. कठिण विषयावर लक्ष द्या, असं सांगतानाच पेन, पेन्सिल घेऊन एक डायरी लिहा. तुमचा वेळ कुठे वाया गेला ते पाहा.

Web Title: What to do if there is exam tension pm modi interacted with students nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2023 | 05:11 PM

Topics:  

  • india
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pariksha Pe Charcha

संबंधित बातम्या

पंतप्रधानांना भेटण्यासाठी सुवर्ण तिकीट, ‘परीक्षा पे चर्चा’च्या शीर्ष विजेत्यांना मिळणार ‘पंतप्रधान निवासस्थानी’ जाण्याची संधी
1

पंतप्रधानांना भेटण्यासाठी सुवर्ण तिकीट, ‘परीक्षा पे चर्चा’च्या शीर्ष विजेत्यांना मिळणार ‘पंतप्रधान निवासस्थानी’ जाण्याची संधी

Mexico tariffs on India: मेक्सिकोच्या निर्णयाने भारतीय उद्योगात खळबळ! भारताची तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात धोक्यात
2

Mexico tariffs on India: मेक्सिकोच्या निर्णयाने भारतीय उद्योगात खळबळ! भारताची तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात धोक्यात

CM Devendra Fadnavis: ‘मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत स्पष्टच सांगितले
3

CM Devendra Fadnavis: ‘मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत स्पष्टच सांगितले

Pax Silica : ट्रम्पने मित्र म्हणून खुपसला मोदींच्या पाठीत खंजीर, Quadमध्ये फूट; ‘या’ महत्वपूर्ण उपक्रमातून भारताला वगळले
4

Pax Silica : ट्रम्पने मित्र म्हणून खुपसला मोदींच्या पाठीत खंजीर, Quadमध्ये फूट; ‘या’ महत्वपूर्ण उपक्रमातून भारताला वगळले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.