Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day 2025 : अण्वस्त्रांच्या धमक्यांना आता सहन करणार नाही; पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून ठणकावून सांगितलं

तरुणांना प्रेरणा देणं गरजेचे आहे. तुमच्या आयडिया जगवा. मी तुमच्या पाठिशी आहे. तुम्ही स्वत:हून पुढाकार घ्या. जर तुमच्या सूचना असतील तर त्या द्या. आपण बदल करू. आता पुढे जाण्याची संधी आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 15, 2025 | 08:38 AM
Independence Day 2025 : अण्वस्त्रांच्या धमक्यांना आता सहन करणार नाही; पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून ठणकावून सांगितलं

Independence Day 2025 : अण्वस्त्रांच्या धमक्यांना आता सहन करणार नाही; पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून ठणकावून सांगितलं

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : कोरोना काळात कोट्यवधी लोकांचे जीव वाचवण्याचे काम आपल्या देशातील तरुणपीढीने केले आहे. सध्या ईव्हीचे युग आहे. त्यानुसार, विकास केला जात आहे. मुद्रा योजनेतही देशातील कोट्यवधी युवक-युवती कर्ज घेऊन स्वत:च्या पायावर उभं राहत आहेत आणि आपल्या साथीदारांनाही मदत करत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं. तसेच अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या देशांनाही सज्जड दम भरला. ‘अण्वस्त्रांच्या धमक्यांना आता सहन करणार नाही’, असेही पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितलं.

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. तिरंग्याला दिलेली सलामी आणि देशासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव आता केला जाणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, तरुणांना प्रेरणा देणं गरजेचे आहे. तुमच्या आयडिया, कल्पना जगवा. मी तुमच्या पाठिशी आहे. तुम्ही स्वत:हून पुढाकार घ्या. जर तुमच्या सूचना असतील तर त्या द्या. आपण बदल करू. आता पुढे जाण्याची संधी आहे. सरकार तुमच्या सोबत आहे. तुम्ही फक्त पुढे या, असे तरुणांना उद्देशून त्यांनी म्हटले आहे.

तसेच पहलगाममध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांचा संहार करण्यात आला. पहलगाममध्ये धर्म विचारुन मारले गेले. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर देशाच्या संतापाची अभिव्यक्ती होती. सेनादलाला आम्ही पूर्ण मुभा दिली होती. लक्ष्य आणि कारवाई त्यांनीच निश्चित केली. पाकिस्तान उद्धवस्त  झाल्यासंबंधी रोज नवनवी माहिती येत आहे. पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झाल्याचीही माहिती आहे.

अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली आहे. अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही, असा इशारा देखील नरेंद्र मोदींनी दिला. सिंधू पाणीवाटप करार अन्यायकारक होता, हे देशाला समजलंय, असंही नरेंद्र मोदींनी सांगितले.

उत्सव देशाच्या एकतेची भावना सतत बळकट करतोय

हा उत्सव देशाच्या एकतेची भावना सतत बळकट करत आहे. तिरंगा भारताच्या प्रत्येक घरात आहे, मग तो वाळवंटापासून हिमालयापर्यंत असो, समुद्रकिनारा असो किंवा दाट लोकवस्तीचा भाग असो. आज आपल्याला लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Web Title: Will no longer tolerate threats of nuclear weapons says pm narendra modi in red fort

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 08:29 AM

Topics:  

  • Independence Day
  • Independence Day 2025
  • narendra modi
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM असो वा CM मुख्यमंत्री…, भ्रष्टाचारी हा तुरुंगात जाईल आणि त्याचे पदही; पंतप्रधान मुख्यमंत्री विधेयकावर मोदींचा महत्त्वाचा निर्
1

PM असो वा CM मुख्यमंत्री…, भ्रष्टाचारी हा तुरुंगात जाईल आणि त्याचे पदही; पंतप्रधान मुख्यमंत्री विधेयकावर मोदींचा महत्त्वाचा निर्

India China Alliance : आता चीननेही भारताच्या हितासाठी जागतिक मंचावर उचलला मोठा झेंडा, 50% करावर थेट विरोध
2

India China Alliance : आता चीननेही भारताच्या हितासाठी जागतिक मंचावर उचलला मोठा झेंडा, 50% करावर थेट विरोध

पंतप्रधान मोदींनी केली फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी चर्चा; युक्रेन आणि मध्य पूर्वेतील संघर्षावर तोडगा काढवण्यावर भर
3

पंतप्रधान मोदींनी केली फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी चर्चा; युक्रेन आणि मध्य पूर्वेतील संघर्षावर तोडगा काढवण्यावर भर

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
4

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.