Modi government try to reduce power of the opposition through the 130th Constitutional Amendment Bill
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह झारखंडमध्येही विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. यामध्ये दोन्ही विधानसभांचे निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळेच आता विधानसभांच्या निवडणुकीनंतर संसदेचे हिवाळी अधिवेशन घेतले जाणार असल्याची माहिती दिली जात आहे. 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत हे संसदेचे अधिवेशन चालणार असल्याचेही म्हटले जात आहे.
हेदेखील वाचा : उद्योग विभागाकडून विधानसभा मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर! विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना 20 नोव्हेंबरला सुट्टी
संसदीय कामकाज मंत्रालयाने पुढील अधिवेशनाची संभाव्य तारीख निश्चित केल्याचीही माहिती आहे. सर्वपक्षीय बैठकीची माहितीही देतील असे एका अधिकाऱ्यानी सांगितले. दरम्यान, या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्याही परदेश दौऱ्यावर जाणार आहेत की नाही, हेदेखील पाहिले जाणार आहे. त्यानुसार, पुढील तारीख अधिकृतरित्या जाहीर केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. येत्या काही दिवसांत संसदेच्या अधिवेशनाची औपचारिक घोषणा केली जाईल. त्यामुळे संसदेचे पुढचे अधिवेशन बरेच गदारोळाचे होऊ शकते, असे मानले जात आहे.
दरम्यान, संसदेच्या या हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून अनेक मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात. त्यात जनगणनेत जातीचा समावेश करण्याची मागणी यासह इतर अनेक मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जाऊ शकतात. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये महाआघाडीचा विजय झाला तर त्यांचा सरकारविरोधातील उत्साह आणखी वाढू शकतो.
हेदेखील वाचा : कल्याणमध्ये महायुतीला बंडखोरीचे ग्रहण ! माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज
‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडले जाणार
लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. एकाचवेळी निवडणुका घेण्याचे विधेयक संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे, या संदर्भातील माहिती सूत्रांनी दिली.