नवी दिल्ली : दिल्लीहून ग्रेटर नोएडाला जाणाऱ्या कारमधून काही तरुणांनी अचानक नोटांचा वर्षाव सुरू केला. तरुणांनी वाहनांमधून चलनी नोटा हवेत फेकल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठी गर्दी झाली. रस्त्यावर पडलेल्या खिशात भरायला सुरुवात केली. त्याचा व्हिडिओही व्हायरल (Viral Video) झाला आहे. पोलिसांनी या धनाढ्य तरुणांना चार लाख रुपयांचे चलान बजावलं आहे.
[read_also content=”पुण्यात समलैंगिक नात्याचा रक्तरंजित अंत, 21 वर्षीय तरुणाचा जोडीदारानं भररस्त्यात केला खून, आरोपी फरार https://www.navarashtra.com/crime/gay-partner-killed-by-youth-in-wagholi-pune-nrps-484587.html”]
सिनेमा आणि वेबसिरिज पाहून लोकं त्यात दाखवल्या दृष्याप्रमाणे करु लागले आहे. फर्जी वेबसिरिजमध्ये चारचाकी गाडीतून हवेत पैसै फेकण्याचा एक सिन आहे. तो पाहून त्याच्याप्रमाणे गाडीतून पैसै फेकण्याचे प्रकार घडू लागले आहेत. नोएडामध्ये पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. लग्न समारंभाला जाण्यासाठी निघालेल्या काही श्रीमंतांच्या मुलांनी सेक्टर-37 च्या रस्त्यावर अचानक नोटा उडवण्यास सुरुवात केली. यावेळी तेथून जाणाऱ्या लोकांनीही क्षणाचाही विलंब न लावता त्या नोटा लुटण्यास सुरुवात केली. अनेकांनी आपली वाहने थांबवून पैसे जमा करून ते आपल्या खिशात भरण्यास सुरुवात केली.
अशाप्रकारे घडणारी ही काही पहिली घटना नाही. तीन दिवसांपूर्वीही अशीच एक घटना उघडकीस आली होती. तेही सेक्टर-३७ मधूनच. आलिशान वाहनांचा ताफा येथून जात असताना त्यामध्ये बसलेल्या मुलांनी चलनी नोटा रस्त्यावर फेकल्या. त्याने वाहनांच्या आतून सायरन वाजवले आणि कारच्या खिडकीतून उडी मारून स्टंटबाजीही केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्या वाहनांना चालना दिली.