दिल्ली-एनसीआरला Apple चं मोठं गिफ्ट! 'या' शहरात सुरु झालं नवीन अॅपल स्टोअर, काय असणार खास? जाणून घ्या
Huawei Mate X7: फोल्डेबल फोनचा नवा बादशाह? 8-इंच इनर डिस्प्ले आणि लयभारी कॅमेरा! किंमत जाणून घ्या
कंपनीने सुरु केलेल्या या नवीन रिटेल स्टोअरमध्ये ग्राहकांना नेक्स्ट लेवल एक्सपीरियंस मिळणार आहे. ग्राहक या स्टोअरमध्ये iPhone 17 सीरीज, M5 चिपवाला iPad Pro आणि 14-इंच MacBook Pro सारखे लेटेस्ट डिव्हाईस वापरून पाहू शकतात. एवढंच नाही तर कंपनीने सुरु केलेल्या या नवीन स्टोअरमध्ये Apple Specialists ग्राहकांना पर्सनल गाइडेंस, प्रोडक्ट डेमो आणि डिवाइस सेटअप सपोर्ट देणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, Apple ने मॉलच्या तळमजल्यावर सुमारे 8,240 चौरस फूट जागा त्यांच्या स्टोअरसाठी भाड्याने घेतली आहे. या ठिकाणी 6 स्टोअर्स एकत्र करून Apple चा एक मोठा, ओपन लेआउट तयार करण्यात आला आहे. हा करार 11 वर्षांसाठी करण्यात आला आहे. म्हणजेच पुढील 11 वर्षांसाठी कंपनीने त्यांच्या स्टोअरसाठी जागा भाड्याने घेतली आहे. कंपनी पहिल्या वर्षासाठी कोणतेही भाडे देणार नाही आणि दुसऱ्या वर्षापासून भाडे प्रति चौरस फूट ₹263.15 असेल.
म्हणजेच कंपनीला सुमारे 45.3 लाख प्रति महिना किंवा 5.4 करोड वार्षिक भाडे भरावे लागणार आहे. असं सांगितलं जात आहे की, या 11 वर्षांच्या कालावधीत कंपनीला एकून 65 करोड रुपये भाडे भरावे लागू शकते. ज्यामध्ये प्रत्येक तीन वर्षाला 15 टक्के वाढ केली जाणार आहे. हा भाडे करार 25 फेब्रुवारी 2025 मध्ये अंतिम झाला होता. मुंबई, दिल्ली, पुणे आणि बंगळुरुनंतर आता ग्राहक थेट नोएडा स्टोरमधून देखील त्यांचे आवडते प्रोडक्ट्स खरेदी करू शकणार आहेत.
नोएडा स्टोरमध्ये देखील टूडे अॅट अॅपलअंतर्गत फोटोग्राफी, म्यूजिक, आर्ट आणि कोडिंगसंबंधित जोडलेले फ्री क्रिएटिव सेशंस आयोजित केले जाणार आहेत, ज्यामुळे यूजर्सना त्यांचे अॅपल डिव्हाईस पूर्णपणे समजण्याची संधी मिळणार आहे.
Ans: Apple Store हे Apple कंपनीचे अधिकृत रिटेल स्टोअर आहे, जिथे iPhone, iPad, MacBook, Apple Watch आणि इतर Apple प्रॉडक्ट्स विकले जातात.
Ans: Apple Store मध्ये iPhone, iPad, MacBook, iMac, Apple Watch, AirPods, Vision Pro तसेच अधिकृत अॅक्सेसरीज मिळतात.
Ans: होय. Apple Store मधून थेट स्टोअरमध्ये जाऊन तसेच Apple च्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन खरेदी करता येते.






