Currency News: ५०० व १००० च्या जुन्या नोटा बदलल्या जातायेत? RBI ने दिला 'या' अफवांना पूर्णविराम (फोटो-सोशल मीडिया)
RBI currency Alert: अलीकडेच, जुन्या नोटांबाबतीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांमध्ये फसवणूक झाली आहे. यासंबधित आरबीआयने स्पष्ट केले आहे की, या नोटा आता बेकायदेशीर आहेत आणि त्यांचे कोणतेही मूल्य नाही. केंद्र सरकारने २०१६ मध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मात्र, अलीकडेच ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांबाबत अफवा पसरली आहे. याबद्दल आरबीआयने या अफवांना पूर्णविराम दिला आहे. जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी सविस्तर..
तुमच्याही कानावर ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा अजूनही बदलल्या जात असल्याची बातमी आली आहे का? तर तुम्ही जे ऐकलं आहे ती निव्वळ एक अफवा आहे. असं आम्ही नाहीतर आरबीआयने स्पष्ट केलं आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने नोटाबंदी केलेल्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या असून आता त्या पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. नोटाबंदीच्या काळात आरबीआयने जनतेला एका निश्चित कालावधीत नोटा बदलून बँकांमध्ये जमा करण्याची आणि जमा करण्याची पुरेशी संधी देण्यात आली होती.
हेही वाचा : WEF Annual Meeting: दावोस 2026 मध्ये भारताचा दबदबा! अंबानी, टाटा, फडणवीस एकाच मंचावर, काय असणार खास?
या घटनेनंतर आरबीआयची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांनी ३.५ कोटींच्या जुन्या नोटा जप्त केल्या. तेव्हा या प्रकरणाचा तपास करत असताना असे समोर आले की, काही लोक जनतेची दिशाभूल करत होते, जुन्या नोटा अजूनही बदलल्या जाऊ शकतात अशी खोटी माहिती पसरवून फसवणूक करत होते. याचा खुलासा होताच, आरबीआय आता कोणत्याही परिस्थितीत या नोटा स्वीकारत नाही. जर कोणाकडे अशा नोटा असतील तर त्या आता कोणत्याही मूल्याच्या नाहीत. असे स्पष्ट केले.
केंद्र सरकारने जुन्या नोटा बदलण्याबाबत पसरणाऱ्या अफवांवर स्पष्टीकरण दिले आहे. सरकारच्या पीआयबीने, तपासणीद्वारे अशा दाव्यांना पूर्णविराम लावला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका बातमीत दावा करण्यात आला होता की आरबीआयने जुन्या ₹५०० आणि ₹१००० च्या नोटा बदलण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत, तर पीआयबी फॅक्ट चेकने हे बनावट असल्याचे घोषित केले. एजन्सीने स्पष्टपणे सांगितले की, आरबीआयने असा कोणताही नियम जारी केलेला नाही.
जुन्या ५०० रुपयांच्या नोटेऐवजी नवीन डिझाइन जारी करण्यात आले आहे, तर १००० रुपयांची नोट कायमची बंद करण्यात आली आहे. कोणत्याही आर्थिक माहितीसाठी फक्त आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर अवलंबून राहण्याचा सल्ला आरबीआयने दिला. चुकीच्या माहितीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते, म्हणून अशा बाबतीत सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.






