अलीकडे काही दिवसात देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे (India Corona Update) देशाची चिंता वाढत असताना गेल्या 24 तासांत देशातील कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट पाहायला मिळाली. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या नव्या 1,272 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, गेल्या 24 तासात तीन जणांचा मृत्यू झाला. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15,515, वर आली आहेत.
गेल्या 24 तासात देशात तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये पंजाबमध्ये दोन मृत्यूची नोंद झाली आहे, तर एका पश्चिम बंगालच्या रुग्णाचा समावेश आहे. या तीन मृत्यूंसह देशभरातली आतापर्यंतची मृतांची संख्या 5,31,770 वर पोहोचली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, आज सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाचा दैनंदिन पॅझिटिव्हीटी रेट 1.02 टक्के आहे साप्ताहिक पॅझिटिव्हीटी रेट 1.20 टक्के आहे. कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांमध्ये आता एकूण संक्रमणांपैकी 0.03 टक्के आहेत, देशभरातील कोविड प्रकरणांची संख्या 4.49 कोटी (4,49,80,674) नोंदली गेली आहे, तर राष्ट्रीय कोविड-19 पुनर्प्राप्ती दर 98.78 टक्के नोंदवला गेला आहे. गेल्या 24 तासात 2,272 लोकांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,44,33,389 वर पोहोचली आहे आणि मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले गेले आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत COVID-19 लसींचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत.
#Unite2FightCorona#LargestVaccineDrive ????? ?????https://t.co/FXxj3aOpoA pic.twitter.com/Idguu5arUv — Ministry of Health (@MoHFW_INDIA) May 14, 2023